दोन महिन्यात २४ शेतकऱ्यांनी संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:32 AM2019-02-27T00:32:42+5:302019-02-27T00:33:02+5:30
जिल्ह्यात प्रत्येक एक वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत सापडलेला असतो.
बीड : जिल्ह्यात प्रत्येक एक वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत सापडलेला असतो. या परिस्थितीमध्ये वाढलेल्या कर्जाचा बोजा कमी होत नसल्याच्या कारणामुळे शेतकरी आत्महत्या करतात या आत्महत्या थांबवण्यात प्रशासनास मात्र अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. यावर्षी आतापर्यंत २४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये १९७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.
यामध्ये बहुतांश शेतकºयांच्या आत्महत्येचं कारण हे नापिकी, बँकेचे कर्ज, दुष्काळ हे आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवण्यात आल्या आहेत. मात्र तरी देखील जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यामध्ये प्रशासन अयशस्वी ठरत आहे.
आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम शासनस्तरावर राबवण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात
आहे.