बीड जिल्ह्यात कोरोनाचे २४३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:45+5:302021-06-06T04:25:45+5:30
बीड : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र चाचण्या कमी की कॉन्टॅक्ट ...
बीड : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र चाचण्या कमी की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमी झाले, यावरही आरोग्य यंत्रणेेला लक्ष द्यावे लागणार आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात २४३ नवे रुग्ण आढळले. बीड वगळता अन्य तालुक्यात रुग्ण संख्या ५० च्या आतच होती. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ८८ हजार १३७ रुग्ण आढळले आहेत.
शुक्रवारी जिल्ह्यातील ३ हजार ९५८ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यात २४३ जण पॉझिटिव्ह आले, तर ३ हजार ७१५ निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १६, आष्टी ३९, बीड ३८, धारुर २०, गेवराई १४, केज २९, माजलगाव २९, परळी ४ , पाटोदा ३४, शिरुर १० आणि वडवणी तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८८ हजार १३७ इतकी झाली आहे.
दहा मृत्यूची नोंद, ३२३३ जणांवर उपचार
शनिवारी दहा मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत २०४२ मृत्यू झाले आहेत; तर ६०४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ८२ हजार ८६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ३२३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.