२४६ रेमडेसिवीर आले अन् संपलेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:51+5:302021-04-21T04:33:51+5:30

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यातच रूग्णसंख्या जसजशी वाढतेय तसतशी इंजेक्शनची मागणीही वाढू लागली आहे. ...

246 Remedies came and went | २४६ रेमडेसिवीर आले अन् संपलेही

२४६ रेमडेसिवीर आले अन् संपलेही

Next

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यातच रूग्णसंख्या जसजशी वाढतेय तसतशी इंजेक्शनची मागणीही वाढू लागली आहे. मागील चार दिवसांपासून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्याकडे नातेवाईकांनी इंजेक्शनसाठी अर्ज केले होते. जवळपास ५०० अर्ज प्राप्त झाले होते. मंगळवारी जिल्ह्यात २४६ इंजेक्शन आले होते. जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून आलेल्या अर्जांची यादी करून त्यांना एका मेडिकलचे नाव देण्यात आले. तेथून नातेवाईकांनी इंजेक्शन घेतले. असे असले तरी आजही शेकडो नातेवाईक या इंजेक्शनच्या प्रतिक्षेत असून जास्तीत जास्त इंजेक्शन उपलब्ध करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

..

मंगळवारी २४६ इंजेक्शन आले होते. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे आलेल्या अर्जांची यादी तयार करून स्टॉक असलेल्या मेडिकलवर नातेवाईकांना पाठविले. आता बुधवारी २४ इंजेक्शन देऊ, असे वरून सांगितले आहे.

-रामेश्वर डोईफोडे, औषध निरीक्षक, बीड.

===Photopath===

200421\20_2_bed_27_20042021_14.jpeg

===Caption===

रेमडेसिवीरसाठी अर्ज केलेल्या नातेवाईकांना जिल्हा प्रशिक्षण केंद्रातून मेडिकलचे नाव देण्यात आले. यासाठी दाेन टेबल तयार करून कर्मचारी नियूक्त केले होते.

Web Title: 246 Remedies came and went

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.