गेवराई तालुक्यात आजपर्यंत २४,६२२ जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:59+5:302021-07-28T04:34:59+5:30

गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून संपूर्ण देश व बीड जिल्हा हैराण असून, हा रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या ...

24,622 people vaccinated in Gevrai taluka till date | गेवराई तालुक्यात आजपर्यंत २४,६२२ जणांचे लसीकरण

गेवराई तालुक्यात आजपर्यंत २४,६२२ जणांचे लसीकरण

Next

गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून संपूर्ण देश व बीड जिल्हा हैराण असून, हा रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक महिने कडक लाॅकडाऊन करण्यात आला. आता लसीकरण करण्यात येत आहे. २६ जुलैपर्यंत तालुक्यातील १८६०० नागरिकांनी पहिला डोस, तर ६३०९ नागरिकांनी दुसरा लसीचा डोस घेतला. एकूण २४६३३ जणांनी डोस घेतला असल्याची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कोरोनाचा देशभरात मोठ्या प्रमाणात फैलाव झाला. यात बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले व अजूनदेखील मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत चालले आहेत. यात अनेकांचा जीव गेला. याला आळा बसावा, यासाठी लसीकरण चालू आहे. यात तालुक्यात गेवराई उपजिल्हा रुग्णालय व चकलांबा, उमापूर, जातेगाव, मादळमोही, निपाणीजवळका, तलवाडा येथे लसीकरण सुरू केल्यानंतर आजपर्यंत म्हणजे २६ जुलैपर्यंत तालुक्यातील जवळपास २४६३३ लसीकरण झाले असल्याची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कोव्हॅक्सिन

वय ४५ पुढे पहिला डोस २०३३

दुसरा डोस ११०६

वय १८ पुढे

पहिला डोस २८४२

दुसरा डोस १२ असे एकूण ५९९३

कोविशिल्ड

वय ४५ पुढे पहिला डोस ९८६०

दुसरा डोस ५१४३

वय १८ पुढे

पहिला डोस ३५६८

दुसरा डोस ४८ असे एकूण १८६२९ लसीचे डोस

दोन्ही वयाचा पहिला डोस

१८३१३

दोन्ही वयाचा दुसरा डोस

६३०९

असे दोन्ही मिळून २४६२२ लसीकरण झाले.

तालुक्यातील नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या जवळच्या लसीकरण केद्रांवर जाऊन लसीकरण करून घ्यावे तसेच शहरातील व तालुक्यातील खासगी डाॅक्टरांनी कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना अँटिजन व आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचा सल्ला द्यावा, असे आवाहन येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी सांगितले.

Web Title: 24,622 people vaccinated in Gevrai taluka till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.