श्रीक्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:34 AM2021-02-24T04:34:12+5:302021-02-24T04:34:12+5:30

धनंजय मुंडे यांनी गडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्याशी केली सविस्तर चर्चा बीड : श्रीक्षेत्र नगद नारायणगडावर राज्यातील भाविकांची ...

25 crore for the development of Shrikshetra Narayangada | श्रीक्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी देणार

श्रीक्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी देणार

Next

धनंजय मुंडे यांनी गडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्याशी केली सविस्तर चर्चा

बीड : श्रीक्षेत्र नगद नारायणगडावर राज्यातील भाविकांची श्रद्धा आहे. गडाच्या विकासासाठी भाजप सरकारच्या काळात २५ कोटींची घोषणा केली होती; परंतु ती पाळण्यात आली नाही. आता गडाच्या विकासासाठी २५ कोटी रुपये लवकर उपलब्ध करून देणार आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्याशी चर्चा करताना दिली.

बीड येथे सोमवारी (दि. २२) मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्याशी गडाच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी आ. अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष बबन गवते, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, बीड पंचायत सभापती बळिराम गवते यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री मुंडे म्हणाले, भाजप सरकारच्या काळात गडाच्या विकासासाठी २५ कोटी देऊ, असा शब्द नगद नारायणाच्या साक्षीने तत्कालीन मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी दिला होता. यातील दोन कोटींच्या कामाला मान्यता मिळाली. मात्र, उर्वरित निधी देण्यात आलेला नाही. विकासकामांचा आराखडा पुन्हा सादर करावा लागणार असून त्याला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर विकासकामांना सुरुवात होईल. गडाच्या विकासासाठी जे जे करता येईल, ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुंडे यांनी दिली. नारायणगडावर होणार ही कामे नारायणगडावर यात्रास्थळ, मंदिरातील विद्युतीकरण, सौरयंत्रणा, विद्युतनिर्मिती, मंदिराच्या परिसरातील दगडी फरशी बांधकाम करणे, प्रसादालय, सार्वजनिक शौचालय, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आणि बाग, रस्ते रुंदीकरण, गोशाळा, दवाखाना, संस्थानाच्या परिसरात वॉटरशेड मॅनेजमेंट, पाण्याची टाकी, रस्तेविकास, तटबंदी व फाटक, कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था, गेस्ट हाऊस, मल्ल निवास, वेस, मल्ल आखाडे, जिम मंडप, तालीम, सार्वजनिक शौचालय, आध्यात्मिक केंद्र, आयुर्वेदिक केंद्र, पेरिफेरी लँडस्केप, ग्रीन हाऊस, भक्तनिवास, शाळा, मुला-मुलींसाठी वसतिगृह, वाचनालय, क्रीडासंकुल, सांस्कृतिक सभा केंद्र, उद्यान, वृद्धाश्रम, पोलीस चौकी, बसस्टँड, रिक्षा स्टँड, वाहनतळ, उपाहागृहे, दुकाने, आदी कामे करण्यात येणार आहेत.

Web Title: 25 crore for the development of Shrikshetra Narayangada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.