सहा दिवसांत २५ दारुविक्रेत्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:23 AM2019-03-18T00:23:12+5:302019-03-18T00:24:39+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु विक्री विरोधात कारवायांची मोहीम हाती घेतली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून केवळ सहा दिवसात तब्बल ३३ गुन्हे दाखल करुन, २५ आरोपींना अटक केली आहे.
बीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु विक्री विरोधात कारवायांची मोहीम हाती घेतली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून केवळ सहा दिवसात तब्बल ३३ गुन्हे दाखल करुन, २५ आरोपींना अटक केली आहे. रविवारीही अंबाजोगाईत हातभट्टी दारुचा अड्डा उध्दवस्त करण्यात आला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कही अवैध दारु विक्रेते, बनविणारे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. ढाबे, हॉटेलची तपासणी केली जात आहे. अचानक छापे मारुन हातभट्टीचे दारु अड्डे उध्दवस्त केले जात आहेत. ११ मार्च रोजी आचारसंहिता सुरु होताच उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी बैठक घेऊन कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे.