२५ टक्के आरटीई निधी न्याय पद्धतीने वाटप करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:42 AM2021-09-16T04:42:13+5:302021-09-16T04:42:13+5:30
बीड : कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्वयंअर्थसाहायित शाळा प्रचंड आर्थिक अडचणीत असून, आरटीई २५ निधी न्याय पद्धतीने वितरित करावा, नसता ...
बीड : कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्वयंअर्थसाहायित शाळा प्रचंड आर्थिक अडचणीत असून, आरटीई २५ निधी न्याय पद्धतीने वितरित करावा, नसता आंदोलनाचा इशारा जिल्हा इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या निधीसाठी संघटनेने अनेकदा आंदोलने करून निवेदन दिलेले आहे. २०१६ पासून या शाळांचा करोडो रुपयांचा निधी अडकला असून, नुकताच काही निधी वर्ग करण्यात आला आहे. परंतु, निधी वितरित करताना अडवणूक होत असून, मर्जी राखणाऱ्यांचाच निधी वर्ग केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. शासनाने पाठविलेला निधी तत्काळ व न्याय पद्धतीने वितरित करावा, अन्यथा अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा देत याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागावर राहील, असे संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजय पवार यांनी नमूद केले आहे.
---
निधीचे वाटप शासन निर्देशानुसारच
आरटीई २५ टक्के निधीचे वाटप शासन निर्देशानुसार १०० टक्के आधार नोंदणीच्या प्रमाणात वितरित करण्यात आला आहे. शासनाकडून प्राप्त निधी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच वितरित केला आहे. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.) बीड.
----------