२५ हजारांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी, कंपाऊंडर जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:34 AM2018-12-16T00:34:14+5:302018-12-16T00:35:27+5:30
वेतन व धनादेश काढण्यासाठी कर्मचाऱ्याकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना भावठाणा (ता.अंबाजोगाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कंपाऊडरला रंगेहाथ पकडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : वेतन व धनादेश काढण्यासाठी कर्मचाऱ्याकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना भावठाणा (ता.अंबाजोगाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कंपाऊडरला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सकाळी ११ वाजता आरोग्य केंद्रातच केली.
महादेव पांडुरंग केंद्रे हे वैद्यकीय अधिकारी आहेत तर प्रशांत बापूराव चोटपगार असे कंपाऊडरचे नाव आहे. तक्रारदाराचे आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे वेतन थकले होते. तसेच भविष्य निर्वाह निधीच्या मंजूर रकमेचा धनादेश काढण्यासाठी डॉ. केंद्रे यांनी २५ हजार रूपयांची लाच मागितली होती. परिस्थिती हलाखीची असल्याने तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिला. मात्र, केंद्रे यांनी ऐकले नाही. अखेर संतापलेल्या कर्मचाºयाने थेट एसीबी कार्यालय गाठून ६ डिसेंबर रोजी तक्रार नोंदविली. पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी पथकामार्फत शनिवारी भावठाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सापळा लावला. कर्मचाºयाकडून थेट लाच स्वीकारण्याऐवजी हे पैसे कंपाऊडर प्रशांतकडे देण्यास केंद्रे यांनी सांगितले. त्याप्रमाणे कर्मचाºयाने प्रशांतकडे पैसे देताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकारी, कर्मचाºयांनी झडप घालत त्याला पकडले. त्यानंतर डॉ.केंद्रेला त्यांच्या कक्षातून अटक केली. दोघांविरोधातही अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे सुरू होते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, विकास मुंडे, दादासाहेब केदार, अमोल बागलाने, मनोज गदळे, चालक नदीम यांनी केली.
उपचार करणाºया हातांत बेड्या
डॉक्टर पदवी मिळताच रूग्णसेवा करण्याची शपथ घेतली. मात्र, भावठाणच्या आरोग्य केंद्रात रूग्णांना कसल्याच सुविधा नव्हत्या. आलेल्या रूग्णांवर तात्काळ उपचार केले जात नव्हते. येथील अधिकारी, कर्मचारीही रूग्णांना व्यवस्थित वागणूक देत नव्हते. एवढेच नव्हे तर येथील डॉक्टरांनी मागील काही दिवसांपासून रूग्णांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ‘इतर’ कामांतच जास्त स्वारस्य दाखविले. त्यामुळेच या उपचार करणाºया हातांमध्ये बेड्या पडल्या, अशी चर्चा दिवसभर होती.