कुष्ठरोगाचे २५३८, तर क्षयरोगाचे ३९४८ नवे संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:33 AM2021-01-03T04:33:05+5:302021-01-03T04:33:05+5:30

बीड : जिल्ह्यात १ ते ३१ डिसेंबरदरम्यान संयुक्त कुष्ठ व क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. यात आरोग्य ...

2538 new cases of leprosy and 3948 new cases of tuberculosis | कुष्ठरोगाचे २५३८, तर क्षयरोगाचे ३९४८ नवे संशयित रुग्ण

कुष्ठरोगाचे २५३८, तर क्षयरोगाचे ३९४८ नवे संशयित रुग्ण

Next

बीड : जिल्ह्यात १ ते ३१ डिसेंबरदरम्यान संयुक्त कुष्ठ व क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. यात आरोग्य विभागाने २२ लाख ६१ हजार ७५७ लोकांचे सर्वेक्षण केले. यात कुष्ठरोगाचे २५३८, तर क्षयरोगाचे ३९४८ नवे संशयित रुग्ण आढळले आहेत, तसेच जवळपास २०० रुग्णांचे निदान झाले आहे.

समाजातील निदान न झालेले क्षय व कुष्ठरुग्ण शोधून त्यांची तपासणी करून तात्काळ उपचार करता यावेत यासाठी आरोग्य विभागाने संयुक्त अभियान राबविले होते. वाडी, वस्तींपासून ते मोठ्या शहरापर्यंत घरोघरी जाऊन सर्वांची माहिती घेण्यात आली. ज्यांना लक्षणे आहेत, अशांची तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत तपासणी करण्यात आली. ज्यांचे निदान झाले, त्यांच्यावर तात्काळ औषधोपचारही करण्यात आले. सध्या या मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात ही मोहीम पूर्ण करण्यात आली.

कोट - फाेटो

पहिल्या दिवसापासूनच सर्वेक्षण हाती घेण्यात आले. आता ते पूर्ण झालेले आहे. संशयितांच्या सर्व तपासण्या केल्या जात आहेत. निदान झालेल्यांवर तात्काळ उपचार करणे सुरू केले आहे. या मोहिमेत सर्व पथकांनी खूप परिश्रम घेतले. अपवादात्मक वगळता नागरिकांनीही खूप सहकार्य केले. त्यामुळे मोहीम यशस्वी झाली.

डॉ. मनीषा आर. पवार, कुष्ठरोग कार्यालय, बीड

अशी आहे आकडेवारी

कुष्ठरुग्ण अभियान

भेटी दिलेली घरे - ४,८६,६१८

तपासलेली लोकसंख्या - २१, ९६,७५७

संशयित कुष्ठरुग्ण - २५३८

तपासलेले संशयित कुष्ठरुग्ण - २२३६

निदान झालेले कुष्ठरुग्ण - ७५

एकूण तपासणी पथके - १६७८

पथक पर्यवेक्षक ३३६

एकूण मनुष्यबळ - २०१४

-----

क्षयरुग्ण अभियान

तपासलेली लोकसंख्या - २२,२८,२७०

शोधलेले संशयित क्षयरुग्ण - ३९४८

निदान झालेले क्षयरुग्ण - १४४

भेटी दिलेल्या घरांची संख्या - ४,७७,११८

एक्स-रे केलेले - २१५८

Web Title: 2538 new cases of leprosy and 3948 new cases of tuberculosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.