अवैध वाळू प्रकरणात जप्त केला २६ लाखांचा मुद्देमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:38 AM2021-03-01T04:38:33+5:302021-03-01T04:38:33+5:30
बीड : गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे विना रॉयल्टी तसेच अनधिकृतरित्या वाळू उपसा करून त्यांची टिप्परच्या साह्याने ...
बीड : गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे विना रॉयल्टी तसेच अनधिकृतरित्या वाळू उपसा करून त्यांची टिप्परच्या साह्याने वाळू उपसा करताना विशेष पथकाने छापा मारून २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
गंगावाडी परिसरात अनधिकृत वाळू उपसा आणि वाहतूक होत असल्याची माहिती विशेष पथकाचे सपोनि विलास हजारे यांना समजली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख विलास हजारे यांच्यासमवेत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर छापा मारला. या कारवाईत एका वाळू माफियाने पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे पोलिसांनी त्याला चोपही दिल्याची माहिती आहे. या करावाईत २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यासंदर्भात सपोनि विलास हजारे यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तलवाडा पोलीस करत आहेत.