बीडमध्ये कार्यमुक्त २७९ शिक्षकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:10 AM2018-11-20T00:10:55+5:302018-11-20T00:11:39+5:30

चार वर्षांपूर्वी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी बीड जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त केल्यानंतर या २७९ शिक्षकांनी आमचा दोष काय? अशी विचारणा आणि न्याय देण्याची मागणी करत सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

279 teachers free from work in Beed | बीडमध्ये कार्यमुक्त २७९ शिक्षकांचे उपोषण

बीडमध्ये कार्यमुक्त २७९ शिक्षकांचे उपोषण

googlenewsNext
ठळक मुद्देन्याय देण्याची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी मांडल्या व्यथा, विविध संघटनांनी दिला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : चार वर्षांपूर्वी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी बीड जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त केल्यानंतर या २७९ शिक्षकांनी आमचा दोष काय? अशी विचारणा आणि न्याय देण्याची मागणी करत सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
कार्यमुक्त शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. बीड जिल्हा परिषदेतील बिंदू नामावली सदोष असून ती तत्काळ दुरुस्त करुन सर्व अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकांना बीड जि. प. मध्येच सामावून घेण्याची मागणी यात केली आहे. महाराष्टÑात आॅनलाईन आंतरजिल्हा बदलीचे दोन टप्पे पार पडले आहेत. मोठ्या प्रमाणात बदल्या झालेल्या आहेत. त्यांच्या मूळ जागा सध्या रिक्त नाहीत, तिथेही कुठला न कुठला प्रवर्ग रिक्त आहे. बदलीमुळे आंतरजिल्हा बदली शिक्षकाची सेवाज्येष्ठता बदलीमुळे अगोदरच शून्य झालेली आहे. आणि सेवा प्रत्यावर्तित केल्याने अजून शून्य होणार आहे. शिवाय अतिरिक्त ठरल्यास पुन्हा त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होऊन न्यायालयीन प्रकरणे उद्भतील असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान जि. प. प्रशासनाच्या निर्णयाचा विविध संघटनांनी निषेध करत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला आहे. तर काही संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
२०१४ मध्ये ९२६ आंतरजिल्हा बदल्या बिंदू नामावलीप्रमाणे झाल्या. नंतर अनियमिततेचे कारण दाखवत बिंदू नामावलीप्रमाणे अतिरिक्त शिक्षकांच्या सेवा प्रत्यावर्तित करण्याबाबत ग्राम विकास मंत्रालयाच्या अवर सचिवांनी पत्र काढले. जर ९२६ बदल्यांमध्ये अनयिमिता झाली तर त्या रद्द करुन सर्व शिक्षकांना मूळ जि. प. कडे प्रत्यावर्तित करणे आवश्यक होते. मात्र, मोजक्याच शिक्षकांवर कार्यवाही केल्याचे उपोषणार्थी शिक्षकांचे म्हणणे आहे.
शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणाची पंचाईत
बीड जिल्ह्यात आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना मिळवत रजू होताना त्रास झाला होता. अधिकारी व पुढाºयांचे उंबरठे झिजवावे लागले. बहुतांश शिक्षकांना पैसे मोजावे लागले, तर या शिक्षकांना वेतनासाठी जवळपास दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागली. बॅँका, पतपेढीचे कर्ज घेतले. मुलांचे शिक्षण बीड जिल्ह्यात सुरु आहे. चार-पाच वर्षांपासून सर्व सुरळीत असताना कार्यमुक्त झाल्याने या शिक्षकांपुढे पेच निर्माण झाला आहे.
शैक्षणिक वर्ष सुरु असताना व निम्मे वर्ष झालेले असताना कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणाची पंचाईत होणार आहे.
कार्यमुक्त शिक्षक म्हणतात...आमचा दोष काय ?
४आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक बीडमध्ये रुजू होऊन ५ वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वांना नियमित पगार सुरु आहे.
४सध्या जि. प. कडे १५३ जागा रिक्त आहेत. पुढील दोन वर्षात पदोन्नतीने व सेवानिवृत्तीने जवळपास ५०० ते ७०० जागा रिक्त होत आहेत. टप्प्या टप्प्याने रिक्त होणाºया जागा मुळ प्रवर्गास उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनात केली आहे.
४सदोष बिंदू नामावली असताना कार्यमुक्तीची कारवाई करताना सर्व शिक्षकांना विश्वासात घेतले नाही.
४प्रगटनातील व प्रसिद्धीपत्रकातील तारीख, वेळ पुरेशी नसल्याने व तफावत असल्याने ही कारवाई एकतर्फी झाली.
४१९९५-९६-९७ मध्ये तयार केलेल्या बिंदू नामावलीत वंजारी, धनगर, बंजारा समाजातील शिक्षक हे खुल्या प्रवर्गातून निवड झालेले असताना २०१४, २०१५, २०१६ व २०१८ या बिंदू नामावलीत काही शिक्षकांना एनटी प्रवर्गात दाखविले आहे. यात दुरुस्ती केलेली नाही.
४२०१३, २०१४ मध्ये अतिरिक्त शिक्षक होते तर २०१६ व २०१७ मध्ये दोन्ही वर्षात आॅनलाईन पद्धतीने शिक्षक बदली करुन आले ते यादीत नाहीत.
४वस्तीशाळा शिक्षक शून्य बिंदूवर ठेवायचे असताना ते प्रवर्गाच्या बिंदूवर ठेवले.
४सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडून शिक्षक आंतरजिल्हा बदलीने बीड जि. प. मध्ये दाखल झाले, मग यात त्यांचा दोष काय?

Web Title: 279 teachers free from work in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.