माजलगाव धरण, गोदावरी पात्रात २८ हजार ५५० क्युसेक आवक; २६ गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 06:22 PM2022-07-26T18:22:35+5:302022-07-26T18:23:06+5:30

सध्या माजलगाव धरणात ४१ टक्के पाणीसाठा असून एक दोन मोठ्या पावसात हे धरण केंव्हाही भरू शकते.

28 thousand 550 cusecs inflow from Jayakwadi to Majalgaon dam, Godavari basin; Vigilance alert for 26 villages | माजलगाव धरण, गोदावरी पात्रात २८ हजार ५५० क्युसेक आवक; २६ गावांना सतर्कतेचा इशारा

माजलगाव धरण, गोदावरी पात्रात २८ हजार ५५० क्युसेक आवक; २६ गावांना सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

- पुरूषोत्तम करवा
माजलगाव (बीड)
: जायकवाडी धरण ९० टक्के भरल्याने १८ दरवाजे वर उचलून गोदावरी पात्रात २८ हजार क्युसेक तर माजलगाव धरणात ५५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी पात्रात केव्हाही पाण्यात वाढ होऊ शकते. वाढणाऱ्या पाणी पातळीमुळे गोदावरीपात्रा शेजारीलं गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने गोदापात्रा शेजारील २६ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाथसागर धरणाच्यावरील भागात जास्त पाऊस झाल्याने धरणात पाणीसाठी ९० टक्क्यांवर झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने जायकवाडीतून गोदावरी नदी पात्रात व माजलगाव धरणात पाणी सोडले आहे. माजलगाव धरणात तीन दिवसापासून तर गोदावरी पात्रात दोन दिवसापासून पाण्याची आवाक सुरू आहे. माजलगाव धरणात मंगळवार रोजी ५५० क्युसेक तर गोदावरी नदीपात्रात २८ हजार २९६ क्युसेक अशी आवक सुरु आहे.

ही आवक लवकरच गोदापात्र आणि धरणात येईल. तसेच पुढील काही दिवसात जास्त पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आताची आवक आणि नंतर पावसामुळे होणाऱ्या पाणीपातळीतील वाढ यामुळे माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात शेजारील गावातील नागरिकांमध्ये आत्तापासूनच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या माजलगाव धरणात ४१ टक्के पाणीसाठा असून एक दोन मोठ्या पावसात हे धरण केंव्हाही भरू शकते. त्यामुळे दोन्ही धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यास अनेक गावांना धोका निर्माण होऊ शकतो.

माजलगाव तालुक्यातील जवळपास २६ गावांना गोदावरी नदी पात्रातून होणाऱ्या निसर्गामुळे धोका निर्माण होऊ शकतो यामुळे प्रशासनाने या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या येथील उपविभागीय अधिकारी नीलम बाफना व तहसीलदार वर्षा मनाळे यावर लक्ष ठेवुन आहेत.

या गावांना धोक्याचा इशारा
नाथसागर व माजलगाव धरण भरल्यास माजलगाव तालुक्यातील मोगरा, गंगामसला, आबेगाव, छत्रबोरगाव, सादोळा, मंजरथ, सरवर पिंपळगाव, सोमठाणा, पुरूषोत्तमपुरी, शेलगावथडी, काळेगावथडी, डुब्बाथडी, महातपुरी, कवडगावथडी, गव्हानथडी, रिधोरी, हिवरा , जायकोवाडी, आळसेवाडी, आडोळा, सुरूमगाव, गुंजथडी, सोन्नाथडी, शुक्लतिर्थलिमगाव, पिंप्रीखुर्द, खतगव्हाण या गावांसह माजलगाव शहरातील आंबेडकर नगर भागास धोका निर्माण होऊ शकतो.

Web Title: 28 thousand 550 cusecs inflow from Jayakwadi to Majalgaon dam, Godavari basin; Vigilance alert for 26 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.