'सिव्हिल'मध्ये २८०, 'आयटीआय'त २०० ऑक्सिजन खाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:08+5:302021-04-18T04:33:08+5:30

बीड : जिल्हा रुग्णालयातील खाटा पूर्ण झाल्याने नर्सिंग हॉस्टेलमध्ये २८०, तर शासकीय आयटीआयमध्ये २०० अशा ४८० खाटा तयार करण्यात ...

280 in Civil and 200 in ITI | 'सिव्हिल'मध्ये २८०, 'आयटीआय'त २०० ऑक्सिजन खाटा

'सिव्हिल'मध्ये २८०, 'आयटीआय'त २०० ऑक्सिजन खाटा

googlenewsNext

बीड : जिल्हा रुग्णालयातील खाटा पूर्ण झाल्याने नर्सिंग हॉस्टेलमध्ये २८०, तर शासकीय आयटीआयमध्ये २०० अशा ४८० खाटा तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व खाटांवर ऑक्सिजन सुविधा असणार आहे. २८० खाटा रविवारपासून कार्यान्वित होणार आहेत, तर आयटीआयच्या २०० खाटा मंगळवारी तयार होतील. याचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी घेतला.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन खाटांची मागणीही वाढली आहे; परंतु जिल्हा रुग्णालयातील खाटा शुक्रवारीच संपल्याने रुग्ण प्रतीक्षेत होते. रुग्णांसह नातेवाइकांची खाटांसाठी तक्रारी येत होत्या, शिवाय खाटा मिळविण्यासाठी धावपळही सुरू होती. यावर उपाययोजना करण्यासाठी आणि नवीन खाटा तयार करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे शनिवारी सकाळीच जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. नर्सिंग हॉस्टेल, डोळ्यांचा कक्षात खाटा तयार केल्या. नर्सिंग हॉस्टेलचे काम थोडेच बाकी असून शनिवारी रात्रीच ते पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. येथे २८० खाटा तयार केल्या आहेत. या सर्व खाटांवर ऑक्सिजन असणार आहे. रविवारी या खाटांवर रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. पाहणीवेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सचिन आंधळकर आदींची उपस्थिती होती.

चौकट,

आयटीआय सीसीसीचे होणार स्थलांतर

शासकीय आयटीआयमध्ये आगोदर लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार केले जात होते; परंतु आता येथे ऑक्सिजन आवश्यक असणाऱ्या बाधितांवर उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी २०० खाटा तयार केल्या आहेत, तर येथील अगोदरची कोविड केअर सेंटर हे इतरत्र हलविले जाणार असून सैनिकी विद्यालयाची परवागनी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

चौकट,

सीईओंच्या सर्वच सीसीसींना भेटी

शहरातील सर्वच कोविड केअर सेंटरमध्ये खाटा पूर्ण भरल्या आहेत. तसेच काही लोकांनी तक्रारी केल्या होत्या. याची गंभीर दखल घेत अजित कुंभार यांनी सर्वच सेंटरला भेटी दिल्या. रुग्णांशी संवाद साधण्यासह आपल्या यंत्रणेला काळजी घेण्याबाबत सूचना केल्या.

कोट

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या २८०, तर आयटीआय सीसीसीचे स्थलांतर करून तेथे डीसीएचसी सुरू करणार आहोत. येथे २०० खाटा असतील. नव्याने ४८० खाटा ऑक्सिजनच्या तयार होतील. सिव्हिलच्या रविवारी, तर आयटीआयच्या सर्व खाटा मंगळवारी रुग्णांच्या सेवेत असतील.

अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड.

===Photopath===

170421\17_2_bed_7_17042021_14.jpeg

===Caption===

जिल्हा रूग्णालयात वाढीव बेड संदर्भात नियोजन करताना सीईओ अजित कुंभार. सोबत डॉ.सुखदेव राठोड, डॉ.पारस मंडलेचा, डॉ.सचिन आंधळकर आदी.

Web Title: 280 in Civil and 200 in ITI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.