सहा तालुक्यांत २८० ऑक्सिजन खाटा होणार तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:34 AM2021-05-12T04:34:54+5:302021-05-12T04:34:54+5:30
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये ऑक्सिजन आवश्यक असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. जिल्हा रुग्णालयासह केज, परळी, अंबाजोगाईत ...
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये ऑक्सिजन आवश्यक असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. जिल्हा रुग्णालयासह केज, परळी, अंबाजोगाईत अगोदरच ऑक्सिजन खाटा तयार केलेल्या आहेत; परंतु त्या अपुऱ्या पडत असल्याने आरोग्य विभागाने आणखी सहा ठिकाणी २८० खाटांचे नियोजन केले आहे. याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्याचे सांगण्यात आले आहे. माजलगावातील ३० खाटांपैकी २० खाटा येत्या दोन दिवसांत कार्यान्वित केल्या जाणार आहेत. सध्या सेंट्रल लाइन ऑक्सिजन नसले तरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि जम्बो सिलिंडर वापरून रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यामुळे आता काही प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
कोट
वाढती रुग्णसंख्या पाहता सहा ठिकाणी २८० ऑक्सिजन खाटा तयार करण्याचे नियोजन आहे. लवकरच त्या कार्यान्वित होतील. तेलगाव आणि माजलगावात आगोदर सुरू होतील.
डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
--
याठिकाणी एवढ्या खाटांचे नियोजन
पाटोदा ३०
माजलगाव ३०
नेकनूर ६०
आष्टी ८०
गेवराई ४०
तेलगाव ४०