नागझरी खून प्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:43 PM2019-09-15T23:43:03+5:302019-09-15T23:43:21+5:30

नागझरी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून संजय काकासाहेब चव्हाण नामक २० वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी गेवराई ठाण्यात रविवारी रोजी १८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 convicted in Nagjari murder case | नागझरी खून प्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल

नागझरी खून प्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील नागझरी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून संजय काकासाहेब चव्हाण नामक २० वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी गेवराई ठाण्यात रविवारी रोजी १८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास धारदार शस्त्राने छातीवर व पोटावर वार करून संजय यास गंभीर जखमी केले होते. वडार गल्ली भागातील रस्त्यावर तो जखमी अवस्थेत पडलेला होता. याचवेळी त्याची बहीण मालन काकासाहेब चव्हाण येथील हातपंपावर पाणी आणण्यासाठी गेली होती. तो तेथे पडलेला दिसला यावेळी बहीणीने त्याला काय झाले विचारणा केली असता त्याने नारायण भारत पवार, पप्पु भारत पवार, रोहिणी शहाद्या चव्हाण, संगिता साईनाथ भोसले यांनी मारल्याचे सांगितले. यातील दोघींनी माझे हात धरले व दोघांनी धारदार शस्त्रांनी वार केले व वडार गल्ली भागात आणून टाकल्याचे संजयने सांगितले होते.
या प्रकरणी मयत संजयच्या बहिणीच्या फिर्यादीवरुन शिवकन्या पवार, सिमा पवार, आगलाव्या पवार, गोट्या पवार, सरस्वती पवार, रमेश गायकवाड (सर्व रा. बांगरनाला वस्ती बालेपीर बीड) तसेच जावेद चव्हाण, शहादया चव्हाण, देवगण चव्हाण, सोनी चव्हाण, चायना चव्हाण, छप्पन चव्हाण सर्व रा. नागझरी, विश्वास चव्हाण रा. रेवकी, नागनाथ काळे रा. शेवगाव, जि. अहमदनगर याच्यांविरूद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे हे करीत आहेत.
यांना झाली अटक : पथके रवाना
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सूचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके, दरोडा प्रतिबंधक पथक, गेवराई पोलीस ठाण्याचे एक पथक अशी चार पथके आरोपीचा शोध घेत आहेत.
खून प्रकरणी रोहिणी शहादया चव्हाण, सिमा पप्पु पवार, संगिता साईनाथ भोसले, सरस्वती भारत पवार, रमेश गायकवाड, विश्वास चव्हाण यांना पोलीसांनी अटक केली.
यातील पाच आरोपींना बीड येथून, तर एकास नागझरी शिवारातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गेवराई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. इतर आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: 3 convicted in Nagjari murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.