बीड-साक्षाळपिंप्री रस्त्यासाठी तीन कोटी ८८ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:39+5:302021-05-23T04:33:39+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दखल बीड : बीड शहरातील करपरा नदीपासून खापरपांगरी-पारगाव शिरस-साक्षाळपिंप्री या रस्त्याच्या कामासाठी केेंद्रीय ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दखल
बीड : बीड शहरातील करपरा नदीपासून खापरपांगरी-पारगाव शिरस-साक्षाळपिंप्री या रस्त्याच्या कामासाठी केेंद्रीय सीआरआयएफमधून ३ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बीड शहरातील करपरा नदीपासून खापरपांगरी-पारगाव शिरस-साक्षाळपिंप्री हा रस्ता खराब झाल्याने सदर रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून सातत्याने होत होती. आमदार संदीप क्षीरसागर यांनी खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. हा निधी मंजूर करण्यासाठी आमदार क्षीरसार यांचा पालकमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू होता.
अंबिका चौक ते करपरा नदीपर्यंत रस्त्यासाठी सहा कोटी
शहरातील अंबिका चौक ते करपरा नदीपर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संदीप क्षीरसागर यांनी सहा कोटी रुपये मंजूर करून घेतले. या रस्त्याची प्रशासकीय पातळीवरील कार्यवाही पूर्ण झाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच सिमेंट रस्ता व नाली बांधकामाच्या कामास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.