इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी ६३१ विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:09 AM2019-09-09T00:09:15+5:302019-09-09T00:10:05+5:30

मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अंतर्गत वंचित, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत २५ प्रवेश देण्याची योजना आहे.

3 students re-enter English school | इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी ६३१ विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी ६३१ विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

Next
ठळक मुद्देआज चौथी विशेष सोडत : २१ सप्टेंबरपर्यंत प्रवेश पूर्ण करावे लागणार

बीड : मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अंतर्गत वंचित, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत २५ प्रवेश देण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत तीन सोडतीनंतर उर्वरित प्रवेशासाठी आता चौथी विशेष सोडत ९ सप्टेंबर रोजी होत असून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऱ्याची प्रक्रिया २१ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आरटीई २००९ अंतर्गत आॅनलाईन प्रवेश देण्यात येतात. जिल्ह्यात आरटीई पात्र १९८ शाळांमधून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. जिल्ह्यात २५७८ जागा होत्या. यासाठी ५१४४ आॅनलाईन प्रवेश अर्ज आले, तर मोबाईल अ‍ॅपद्वारे ३५ अर्ज आले. यापैकी ३०७२ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यानंतर आतापर्यंत तीन फेºया पूर्ण झाल्या. या फेऱ्यांमध्ये एकूण १९४७ प्रवेश पूर्ण झाले होते. तर ६२१ विद्यार्थी इंग्रजी शाळांतील प्रवेशापासून वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांमधून निवडीसाठी शिक्षण संचालकांनी एका आदेशाद्वारे चौथी विशेष सोडत होणार असल्याचे जाहीर केले. ९ सप्टेंबर रोजी सोडत होणार आहे. तर ११ ते २१ सप्टेंबरपर्यंत पालकांना आपल्या पाल्याचे प्रवेश घ्यावयाचे आहेत.
चौथ्या फेरीपर्यंत अनेकांचे इतरत्र प्रवेश
आरटीई अंतर्गत तीन प्रवेशानंतर त्वरित आढावा घेऊन चौथ्या फेरीबाबत निर्णय व्हायला हवा होता. अनेक पालकांनी तिसºया सोडतीनंतर कोणतीही आशा न बाळगता व प्रतीक्षा न करता आपल्या पाल्यांना मराठी शाळांमध्ये प्रवेश दिला.
चौथी फेरी ९ सप्टेंबर रोजी होत आहे. वास्तविक पाहता शैक्षणिक वर्ष सुरु होऊन तीन महिने झाले आहेत. त्यामुळे चौथ्या फेरीला किती प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.
खर्च, पसंती, अंतराचे कारण
पसंतीच्या शाळा न मिळाल्याने तसेच घरापासून शाळेचे नियमानुसार अंतर जास्त असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले नाहीत. त्याचबरोबर इंग्रजी शाळांमधील इतर खर्चामुळे सामान्य पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेतले नाहीत.
दुसरीकडे इंग्रजी शाळांचा सुमार दर्जा, गुणवत्तेपेक्षा केवळ देखावा या भुलभुलैय्यामुळे पालकांनी इंग्रजी शाळेला पसंत केले नाही. आता या चौथ्या फेरीतून निवडीनंतर किती प्रवेश होतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: 3 students re-enter English school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.