अल्पवयीन मेव्हणीवर अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:08 AM2019-08-27T00:08:40+5:302019-08-27T00:12:30+5:30

अल्पवयीन मेव्हणीला पळवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने आरोपी अक्षय गोपाळ चांदणे (रा. बीड ) यास अपहरण प्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड तसेच बलात्कार व बाललैंगिक अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा येथील सातवे विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. नाजेरा शेख यांनी सोमवारी सुनावली.

3 years forced labor for torture of minor girl | अल्पवयीन मेव्हणीवर अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मेव्हणीवर अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देबीड येथील प्रकरण : सातवे विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

बीड : अल्पवयीन मेव्हणीला पळवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने आरोपी अक्षय गोपाळ चांदणे (रा. बीड ) यास अपहरण प्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड तसेच बलात्कार व बाललैंगिक अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा येथील सातवे विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. नाजेरा शेख यांनी सोमवारी सुनावली.
शहरातील शुक्रवार पेठ भागात राहणाऱ्या अक्षय गोपाळ चांदणे (२२) व संगीता (काल्पनिक नाव) यांचा २०१५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. आॅक्टोबर २०१६ मध्ये स्टोव्हच्या भडक्याने ती जळाली होती. तिच्या उपचारासाठी बीडनंतर पुढील उपचार व प्लास्टिक सर्जरीसाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. गंभीर भाजलेल्या संगीतासोबत तिची आई, पती अक्षय हे गेले होते. तर बीड येथे घरी संगीताची आजी, आजोबा आणि लहान बहिण सुनीता (वय १६, काल्पनिक नाव) हे होते. औरंगाबाद येथे उपचारादरम्यान अक्षय बीडला आला आणि मेव्हणी सुनीताला सोबत घेऊन पळून गेला. सुनीता बीडमधील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती. संध्याकाळी सुनीता घरी आली नसल्याने तिच्या मावशीने तिच्या आईला कळविले. ६ आॅक्टोबर २०१६ रोजी हा प्रकार घडल्यानंतर शोधाशोध झाली. अक्षयने मेव्हणीला पळवून नेल्याची बाब समजल्यानंतर सुनीताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन अक्षयविरुद्ध अपहरणाचा गुन्हा पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
दरम्यान अक्षय आणि मेव्हणी सुनीता हे पुणे येथे अक्षयच्या नातेवाईकाकडे राहिले. ९ नोव्हेंबर २०१६ रोजी पेठ बीड ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. भोसले यांनी दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. त्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत सुनीता ही ५ महिन्यांची गर्भवती असल्याची बाब निष्पन्न झाली. तर न्याय वैद्यक चाचणीत डीएनए नमुने पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने अक्षय व सुनीता यांचे संबंध स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणात कलम ३७६ व पोक्सोअंतर्गत गुन्ह्याचे कलम वाढले. तत्कालीन अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भोसले यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सातवे विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. नाजिरा शेख यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान १२ साक्षीदार तपासले. यात तपासी अधिकारी भोसले, पीडितेची आई, पुणे येथील अक्षयचे नातेवाईक, सुनीता यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. दोष सिद्ध झाल्याने अक्षय चांदणे यास अपहरण केल्याप्रकरणी ५ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड तसेच बलात्कार व बाललैंगिक अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड अशी एकत्रित शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अनिल धसे यांनी काम पाहिले.

Web Title: 3 years forced labor for torture of minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.