३०२ अतिरिक्त शिक्षक होणार कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:10 AM2018-11-17T00:10:25+5:302018-11-17T00:11:11+5:30

आंतर जिल्हा बदलीने आलेल्या सहशिक्षक बिंदूनामावलीप्रमाणे अतिरिक्त झाल्याने ३०२ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

302 additional teachers will be free | ३०२ अतिरिक्त शिक्षक होणार कार्यमुक्त

३०२ अतिरिक्त शिक्षक होणार कार्यमुक्त

Next
ठळक मुद्देबीड जिल्हा परिषदेतील चार वर्षांपासूनचे प्रकरण : न्यायालयांत विविध २० याचिका होत्या दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आंतर जिल्हा बदलीने आलेल्या सहशिक्षक बिंदूनामावलीप्रमाणे अतिरिक्त झाल्याने ३०२ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
चार वर्षांपासून या संदर्भात तक्रारी होत्या. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणी दाखल जनहित याचिका व न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रत्यावर्तनाची कार्यवाही जलदगतीने सुरु आहे. १६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ३०२ शिक्षकांची सुनावणी संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी संबंधित शिक्षकांनी त्यांच्या दुरुस्त्या सादर केल्या. बिंदू नामावलीप्रमाणे अतिरिक्त ठरलेल्या या शिक्षकांना तत्काळ त्या - त्या जिल्हा परिषदांमध्ये प्रत्यावर्तन करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बीड जिल्हा परिषदेत २०१४-१५ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्कालीन विभाग प्रमुखांविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या चौकशी समितीने चौकशी अहवाल सादर केला. यात २४ सप्टेंबर २०१४ रोजी बीड जिल्हा परिषदेत आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची तसेच वस्तीशाळा शिक्षकांना निमशिक्षक म्हणून पदस्थापना दिल्याबाबत चौकशी करुन या समितीने अहवाल सादर केला होता. पदस्थापनेत अनियमितता झाल्याने २३ एप्रिल रोजी आंतर जिल्हा बदलीने बीड जि. प. येथे रुजू झालेल्या सर्व शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे व त्यांच्या सेवा मुळ जिल्ह्यातील आस्थापनेवर प्रत्यावर्तित करऱ्यात याव्यात तसेच बीड जि. प. मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या सर्व वस्तीशाळा शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले होते. या आदेशाविरुद्ध विविध शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत एकूण २० याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर न्यायालयाने आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना शासनाकडून मंजूर पदांबाबत निश्चिती हाईपर्यंत आहे त्या ठिकाणी कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले होते. तसेच प्रवर्गाबाबत माहिती घेण्याचे व नोटीस बजावून पुरेशी संधी देण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यानंतर ८८६ शिक्षकांच्या यादीतील शिक्षकांची तपासणी करुन बीड जि. प. मध्ये रजू झालेल्या शिक्षकांपैकी मागासवर्गीय कक्षच्या सहायक आयुक्तांनी प्रमाणित केलेल्या बिंदूनामावलीनुसार अतिरिक्त झालेल्या ३४२ सहशिक्षकांची सेवा त्यांच्या मूळ जिल्ह्यात किंवा इतर जिल्ह्यात प्रत्यार्पित करण्याबबात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. २३ आॅगस्टपर्यंत त्रुटींची पूर्तता करुन बिंदू नामावलीला प्रमाणित केले होते.
दरम्यान ग्रामविकास विभागाच्या अवर सचिवांच्या ८ आॅगस्ट रोजीच्या पत्रानुसार शासनाने बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त झालेल्या आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना त्यांच्या मुळ जिल्ह्यात पाठविण्यात यावे असे आदेश दिले. दरम्यान आंतर जिल्हा बदलीने बीड जि. प. मध्ये सामावून घेतलेल्या शिक्षकांमुळे इतर प्रवर्गातील शिक्षक अतिरिक्त झाल्याने व मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील शिक्षकांचा अनुशेष शिल्लक असल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल झाली होती. त्यानंतर या प्रकरणी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात झालेल्या निर्णयानुसार कार्यवाही होत असून २० नोव्हेंबरपर्यंत याबाबत अंतीम निर्णय होण्याची शक्यता आहे. रोस्टर डावलून बीड जिल्ह्यात आलेल्या व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांवर होणाºया कार्यमुक्तीच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
शिक्षणाधिकाºयांना निर्देश : बिंदूनामावलीप्रमाणे कार्यवाही करा
४शिक्षणाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची अद्यावत बिंदू नामावली सर्व त्रुटींची पुर्तता करुन २० आॅगस्ट २०१८ पूर्वी मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करावी. आंतर जिल्हा बदलीमुळे बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमध्ये बदली होवून आलेल्या व मागासवर्गीय कक्षच्या सहायक आयुक्तांनी २९ नोव्हेंबर मंजूर केलेल्या बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरणाºया सर्व शिक्षकांना त्या- त्या जिल्हा परिषदेंमध्ये प्रत्यावर्तीत करण्याबाबत शिक्षणाधिकाºयांनी तत्काळ कार्यवाही करावी. हे करताना सर्वात सेवाकनिष्ठ शिक्षकांचे प्रथम प्रत्यावर्तन करावे.
४या प्रत्यावर्तनामुळे काही विशिष्ट शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांचे प्रत्यावर्तन होत असल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची शिक्षणाधिकाºयांनी दक्षता घेवून आवश्यक ते शिक्षक स्थानिक पातळीवर उपलब्ध करुन द्यावे.
४२० आॅगस्टपर्यंत मंजूर करुन घेºयात येणाºया बिंदू नामावलीमुळे आरखी काही शिक्षक अतिरिक्त होत असल्यास त्यांचेही तत्काळ त्या- त्या जिल्हा परिषदांमध्ये प्रत्यावर्तन तत्काळ करावे. जिल्हा परिषदेंतर्गत मंजूर बिंदू नामावली व्यतिरिक्त शिक्षकांची पदे भरली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

Web Title: 302 additional teachers will be free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.