केज तालुक्यातील मस्साजोग येथे सापडली ३०६ पुरातन नाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:08 IST2020-07-27T19:07:58+5:302020-07-27T19:08:27+5:30
बाबत पुरातत्व विभाग आणि महसूल प्रशासनाला कळवून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग येथे सापडली ३०६ पुरातन नाणी
केज (जि. बीड) : केज तालुक्यातील मस्साजोग येथे अमोल लालासाहेब देशमुख यांच्या मालकीच्या जागेत शौचालयाच्या शोष खड्ड्याचे खोदकाम करणाऱ्या मजुरांना एका मडक्यात ठेवलेले निजामकालीन आणि इंग्रजकालीन पांढऱ्या चांदीसदृश धातूची ३०६ नाणी सापडली आहेत.
घरमालकांनी निजामकालीन आणि इंग्रजकालीन पांढऱ्या चांदीसदृश्य धातूची ३०६ ही नाणी ताब्यात घेतली असल्याचे माहिती केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना समजली. त्यानंतर त्यांच्या आदेशावरून पोकॉ.धनपाल लोखंडे, बाळकृष्ण मुंडे आणि श्रीराम चेवले यांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल ताब्यात घेतला.
या बाबत पुरातत्व विभाग आणि महसूल प्रशासनाला कळवून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सापडलेल्या नाण्यांमध्ये १८६२ मधील १०० व १९०५ मधील १०० नाणी तर काही निजामकालीन नाणी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी ‘लोकमत’ ला दिली.