३४ भाजी, फळे विक्रेत्यांना कर्जवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:33 AM2021-01-03T04:33:27+5:302021-01-03T04:33:27+5:30
कुसळंब : केंद्र शासनाच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत एकूण ३४ फळे, भाजी विक्रेत्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात ...
कुसळंब : केंद्र शासनाच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत एकूण ३४ फळे, भाजी विक्रेत्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. पाटोदा येथील एसबीआय शाखेत १ जानेवारी रोजी पंतप्रधान स्वनिधी योजना ऋण वितरण मेळाव्यात संबंधितांना कर्जमंजुरीचे पत्र देण्यात आले.
यावेळी शाखाप्रमुख उमेश म्हस्के यांनी फळे, भाजी व अन्य विक्रेत्यांना या योजनेचे महत्त्व पटवून दिले. सहायक शाखा प्रमुख हिरामण मोरे यांनीही उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार टाक, सहायक पोलीस निरीक्षक डी.बी. कोळेकर, एस. डी. ओ. कार्यालयाचे महादेव चौरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बँकेचे कर्मचारी सचिन मदुरे, अविनाश कडू, तेजस गुरूनवाड, मुजम्मिल शेख, अविनाश ढेरे आदी उपस्थित होते.