डासांनी घेतले ३४ जणांचे बळी

By सोमनाथ खताळ | Published: September 26, 2024 10:45 AM2024-09-26T10:45:05+5:302024-09-26T10:45:38+5:30

हिवतापाचे सर्वांत जास्त ११ मृत्यू गडचिरोली जिल्ह्यात झाले

34 people were killed by mosquitoes | डासांनी घेतले ३४ जणांचे बळी

डासांनी घेतले ३४ जणांचे बळी

बीड : राज्यात जानेवारी ते २१ सप्टेंबर २०२४ पर्यंत हिवतापाचे १४ हजार रुग्ण आढळले असून यापैकी १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर डेंग्यूचेही १२ हजार रुग्ण आढळले असून मृत्यूचा आकडा १९ आहे. चिकुनगुनियाचेही तीन हजार रुग्ण आढळले, परंतु सुदैवाने एकाचाही मृत्यू झाला नाही.  

सर्वाधिक मृत्यू कुठे? 
- हिवतापाचे सर्वांत जास्त ११ मृत्यू गडचिरोली जिल्ह्यात झाले. चंद्रपूर २, गोंदिया, ठाणे येथे प्रत्येकी १ मृत्यू. 

-  डेंग्यूने ४ मृत्यू रायगडमध्ये झाले आहेत. त्यानंतर ठाणे, नागपूरमध्ये प्रत्येकी दोन, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येकी तिघांचा जीव गेला. कोल्हापूर, पालघर, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, वर्धा या जिल्ह्यांत प्रत्येकी एक मृत्यूची नोंद आहे.
 

Web Title: 34 people were killed by mosquitoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.