जागतिक महिला दिनानिमित्त परळी येथे बचत गटांना ३५ लाख रुपये कर्ज वाटप - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:32 AM2021-03-10T04:32:54+5:302021-03-10T04:32:54+5:30

परळी पंचायत समिती सभागृहात घेतलेल्या कार्यक्रमात तालुक्यातील बचत गटांना ३५ लक्ष रुपये कर्ज प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले असून, ...

35 lakh loan allotted to self help groups at Parli on the occasion of International Women's Day - A | जागतिक महिला दिनानिमित्त परळी येथे बचत गटांना ३५ लाख रुपये कर्ज वाटप - A

जागतिक महिला दिनानिमित्त परळी येथे बचत गटांना ३५ लाख रुपये कर्ज वाटप - A

Next

परळी पंचायत समिती सभागृहात घेतलेल्या कार्यक्रमात तालुक्यातील बचत गटांना ३५ लक्ष रुपये कर्ज प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले असून, सदर गटांना एकूण ४ कोटी २१ लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे हे उपस्थित होते.

यावेळी अजय मुंडे यांनी जागतिक महिला दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमात बचत गटांना विविध उद्योग व्यवसायासाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परळीचे शाखा व्यवस्थापक अरविंदकुमार बदने, मोहा शाखा व्यवस्थापक नाटकर, आयसीसी बँकेचे श्रीनिवास नरवाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उमेद अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँक सखी, सीआरपी, कृषी सखी सीटीसी व प्रभाग संघ व्यवस्थापक केडरचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला उपसभापती जानीमिया खुरेशी, गटविकास अधिकारी संजय केंद्रे व सदस्य मोहन सोळुंके, सटवाजी फड, वसंतराव तिडके, मोहनराव आचार्य, भरतराव सोनवणे, महिला विकास अधिकारी रोडे, पंडित इत्यादी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक सचिन हरणावळ, समन्वयक शिल्पा बुकलवार यांनी केले व कार्यक्रमाचे आभार कुणाल मुंडे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

===Photopath===

090321\09bed_2_09032021_14.jpg

===Caption===

जागतिक महिला दिनानिमित्त परळी येथे बचत गटांना 35 लाख रुपये कर्ज वाटप केले

Web Title: 35 lakh loan allotted to self help groups at Parli on the occasion of International Women's Day - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.