बीडमध्ये धारदार शस्त्रांसह ३६ पोती गुटखा जप्त; एलसीबी, पेठबीड पोलिसांच्या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 06:02 PM2018-01-16T18:02:07+5:302018-01-16T18:06:16+5:30

छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणार्‍या पेठबीडमधील इस्लामपुरा भागातील माफियाच्या घरावर मंगळवारी सकाळी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये धारदार शस्त्रांसह तब्बल ३६ पोती गुटखा, एक स्कूटी व जीप जप्त करून तिघांना गजाआड केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पेठबीड पोलिसांनी केली. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

36 gutka sacks seized with sharp weapons in Beed | बीडमध्ये धारदार शस्त्रांसह ३६ पोती गुटखा जप्त; एलसीबी, पेठबीड पोलिसांच्या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ

बीडमध्ये धारदार शस्त्रांसह ३६ पोती गुटखा जप्त; एलसीबी, पेठबीड पोलिसांच्या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ

googlenewsNext
ठळक मुद्देछुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणार्‍या पेठबीडमधील इस्लामपुरा भागातील माफियाच्या घरावर आज  सकाळी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये धारदार शस्त्रांसह तब्बल ३६ पोती गुटखा, एक स्कूटी व जीप जप्त करून तिघांना गजाआड केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पेठबीड पोलिसांनी केली.

बीड : छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणार्‍या पेठबीडमधील इस्लामपुरा भागातील माफियाच्या घरावर आज  सकाळी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये धारदार शस्त्रांसह तब्बल ३६ पोती गुटखा, एक स्कूटी व जीप जप्त करून तिघांना गजाआड केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पेठबीड पोलिसांनी केली. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

इस्लामपुरा भागात शेख सर्फराज उर्फ शप्पू याच्या घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना मिळाली. त्यांनी आपल्या खबर्‍यांमार्फत खात्री करून घेतली. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी सापळा लावण्यात आला. जीपमधून गुटखा येताच पोलिसांनी शप्पूच्या घरावर छापा टाकला. यामध्ये तब्बल ३६  पोती गुटखा जप्त केला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एक तलवार, एक कुकरी व एक सुरा असे धारदार शस्त्र आढळून आले. तसेच गुटखा वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेली नवी कोरी जीप व एक स्कूटी जप्त करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. गुन्हा दाखल झाल्यावरच याची खरी किंमत समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, पेठबीडचे पोनि बाळासाहेब बडे, सपोनि सचिन पुंडगे, परमेश्वर सानप, गोरख मिसाळ, बाबु उबाळे, मोहन क्षीरसागर, दत्तात्रय गलधर, अनिल डोंगरे, ठोंबरे, विष्णू रोकडे, पाईकराव, हरी बांगर, शेख आशेद, नाईकवाडे, जाधव, मोमीन, सानप, राठोड आदींनी केली.

अन्न सुरक्षा अधिकारी रजेवर
पोलिसांनी कारवाई करून गुटखा ताब्यात घेतला. परंतु त्यापुढील कारवाईचे अधिकारी केवळ अन्न व औषध प्रशासनाला आहेत. येथील कार्यालयात मनुष्यबळ अपुरे आहे. केवळ एकच अन्न सुरक्षा अधिकारी आहेत. त्या सुद्धा सध्या रजेवर असल्याने त्यांचा पदभार नांदेड येथील सुरक्षा अधिकार्‍यांकडे आहे. विशेष म्हणजे नांदेड येथेही मंगळवारी गुटख्याची कारवाई झालेली आहे. त्याच कारवाईत नांदेडचे सुरक्षा अधिकारी व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना बीडच्या कारवाईकडे येता आले नाही. बुधवारी सकाळी येऊन ते कारवाई करतील, असे सहायक आयुक्त अभिमन्यू केरूरे यांनी सांगितले.

शप्पूवर झाला होता गोळीबार
साधारण तीन महिन्यांपूर्वी क्रिकेट खेळून घरी जात असताना शप्पूवर गोळीबार झाला होता. यामध्ये तो बालंबाल बचावला होता. हा हल्ला गुटख्याच्या वादातूनच झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात होता. मंगळवारी सापडलेल्या गुटखा साठ्यावरून याला दुजोरा मिळाला. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

राजकीय पुढार्‍यांचा होता पोलिसांवर दबाव
शप्पूवर हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांना अटक करा, या मागणीसाठी काही राजकीय पुढार्‍यांनी पोलिसांना चांगलेच परेशान केले होते. त्यानंतरही काही पुढार्‍यांनी पत्रकबाजी करून हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता शप्पूच्या घरी गुटखा सापडल्याने त्याला पत्रकबाजी करणार्‍या राजकीय व्यक्तींचा पाठबळ आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात असून अनेक बड्या पुढार्‍यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: 36 gutka sacks seized with sharp weapons in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड