अनुकंपावर नियुक्तीच्या प्रस्तावासाठी ३७ हजारांची लाच; 'स्वाराती'चा लिपीक रंगेहाथ पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 07:00 PM2023-04-10T19:00:42+5:302023-04-10T19:01:43+5:30

८० हजार रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती ३७ हजार रुपये स्वीकारले

37 thousand bribe for proposal of appointment on compassion; Clerk of 'SRT Govt Hospital' caught red-handed | अनुकंपावर नियुक्तीच्या प्रस्तावासाठी ३७ हजारांची लाच; 'स्वाराती'चा लिपीक रंगेहाथ पकडला

अनुकंपावर नियुक्तीच्या प्रस्तावासाठी ३७ हजारांची लाच; 'स्वाराती'चा लिपीक रंगेहाथ पकडला

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड) :  येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालयातील लिपिकास ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. अशोक अच्युतराव नाईकवाडे (वय 42, रा. जोगेश्वरी कॉलनी, चनई, ता. अंबाजोगाई) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

मयत सासरे यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर तक्रारदार यांच्या पत्नीस नियुक्तीचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव सादर करून नियुक्ती ऑर्डर देण्यासाठी लिपिक अशोक नाईकवाडेने तक्रारदाराकडे ८० हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता साक्षीदार समक्ष ८० हजार रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती ३७ हजार रुपये स्वीकारण्याचे नाईकवाडे याने मान्य केले. 

दरम्यान, आज स्वामी रामानंद तीर्थवैद्यकीय महाविद्यालयाच्या गेटसमोरील हॉटेलमध्ये लाचेची ३७ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना नाईकवाडेस एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल धस यांनी केली. सोबत पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश म्हेत्रे हे उपस्थित होते.

Web Title: 37 thousand bribe for proposal of appointment on compassion; Clerk of 'SRT Govt Hospital' caught red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.