पाटोदा तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींसाठी ३७२ उमेदवारी अर्ज; दासखेड, पारगाव घुमरा, ढाळेवाडी, काकड हिरा ग्रा. पं. कडे सर्वांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:11+5:302021-01-02T04:28:11+5:30
पाटोदा : पाटोदा तालुक्यातील मुदत संपलेल्या नऊ ग्रामपंचायतींच्या ७३ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ३० ...
पाटोदा : पाटोदा तालुक्यातील मुदत संपलेल्या नऊ ग्रामपंचायतींच्या ७३ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ३० डिसेंबरपर्यंत ३७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पाटोदा तालुक्यात ५९ ग्रामपंचायती असून मे -जूनअखेर मुदत संपलेल्या नऊ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम कोरोनामुळे पुढे ढकलला होता. त्यामुळे तालुक्यातील पारगाव घुमरा, ढाळेवाडी, दासखेड, काकडहिरा, अनपटवाडी, उखंडा, निर्गुडी, खडकवाडी, बेदरवाडी या ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या नऊ ग्रामपंचायतींसाठी ३० डिसेंबरअखेर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३० पर्यंत या नऊ ग्रामपंचायतीच्या ७३ जागांसाठी ३७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पारगाव ५८, दासखेड ७४, अनपटवाडी ३४, ढालेवाडी २२, उखंडा २९, निर्गुडी ४२, काकडहिरा ४५, खडकवडी ३८ व बेदरवाडी ३०.
नऊ ग्रामपंचायतींमध्ये पारगाव घुमरा, दासखेड, ढाळेवाडी व काकडहिरा या ग्रामपंचायतींना मोठे महत्त्व आहे. यामध्ये पारगाव घुमरा गावात आ. सुरेश धस यांना मानणारा मोठा वर्ग असून भाजपाचे तालुकाध्यक्षही याच गावातील आहेत. पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती केशव रसाळ यांचे हे गाव आहे. पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तात्यासाहेब हुले यांच्यादृष्टीने ढाळेवाडीकडे सर्वांचे लक्ष आहे तर माजी पं. स. सदस्य विष्णुपंत जायभाये व त्याचें चिरंजीव महादेव जायभाये यांच्या दृष्टीने महत्त्व असल्याने या गावातील निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.