जिल्ह्यातील ३९ हजार लोकांनी कोरोनाला हरविले - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:30+5:302021-04-26T04:30:30+5:30
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबरीने मृत्यूही होत आहेत. असे असले, तरी कोरोनामुक्त ...
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबरीने मृत्यूही होत आहेत. असे असले, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही कमी नाही. आतापर्यंत ३९ हजार ५८३ लोकांनी कोरोनाला हरवून दाखविले आहे. त्यामुळे लोकांनी सकारात्मक राहून कोरोनाशी केवळ लढाच द्यायचा नाही, तर त्याला हरविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पैकी ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेत ५०० मृत्यू झाले होते, तर दुसऱ्या लाटेत ५ मार्चपासून आजपर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. मृत्यू होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. वाढती रुग्णसंख्या आणि वाढता मृत्यू ही बाब चिंताजनक आहेच, परंतु त्या तुलनेत एकूण बाधितांच्या तुलनेत ८५ टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे. ही बाबही दिलासादायक आहे.
अगदी एका वर्षाच्या मुलापासून ते ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांनीही कोराेनाला हरवून दाखविले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट १२.६६ टक्के
जिल्ह्यात सध्या रुग्णसंख्या वाढत असली, तरी कोरोनामुक्तही होत आहेत. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १२.६६ टक्के एवढा आहे.
घाबरू नका, कोरोनाला आम्हीही हरवले आहे
सप्टेंबर, २०२० मध्ये कोरोनाची बाधा झाली. थोडा त्रास झाला, पण मात करून बाहेर आलो. आज पुन्हा रुग्णसेवा करत आहेत. कोरोना झाला, तरी घाबरून जाऊ नये. मनातील गैरसमज दूर करून धैर्याने सामना करीत मानसिकता सकारात्मक ठेवा.
- डॉ.एल.आर.तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा
सप्टेंबर, २०२० मध्ये कोरोनाची बाधा झाली. थोडा त्रास झाला, पण मात करून बाहेर आलो. आज पुन्हा रुग्णसेवा करत आहेत. कोरोना झाला, तरी घाबरून जाऊ नये. मनातील गैरसमज दूर करून धैर्याने सामना करीत मानसिकता सकारात्मक ठेवा.
- शुभांगी प्रशांत मुळे,
शिवाजी विद्यालयाजवळ, बीड
मला कोरोना झाला. मी खूप घाबरले होते, पण यात मला भावाने मानसिक आधार दिला. डॉक्टरांच्याही संपर्कात होते. आज मी होम आयसोलेट राहून कोरोनावर मात केली आहे. कोरोना झाला, तरी घाबरू नका, आपणही यावर मात कराल.
- सोनल अरविंद पाटील, बीड
जिल्ह्यात कोरोना येऊच नये, यासाठी २०२० पासूनच आमचे प्रशासन प्रयत्न करीत आहे. राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना, बीडचा आकडा शून्य होता. एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर ही संख्या वाढत गेली. सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूही होत आहेत, पण सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल ३९ हजार लोकांनी कोरोनाला हरविले आहे. याच लोकांमध्ये मीही आहे. त्यामुळे मानसिकता सकारात्मक ठेवावी.
- डॉ.आर.बी.पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.