आरटीईच्या २२२१ जागांसाठी ३९४३ अर्ज - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:18+5:302021-04-03T04:30:18+5:30
बीड : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी विनाअनुदानित इंग्रजी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के मोफत जागांसाठी राबविण्यात ...
बीड : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी विनाअनुदानित इंग्रजी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के मोफत जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील २,२२१ जागांसाठी जवळपास चार हजार अर्ज भरण्यात आले आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली होती. बीड जिल्ह्यात २३३ पात्र शाळांमधील २ हजार २२१ जागांसाठी ३ हजार ९४३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यासाठी नोंदणीची मुदत संपल्यावर आता ६ एप्रिलला प्रवेशाची लॉटरी काढण्याचे निश्चित होत आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी ३ एप्रिलपर्यंत ‘डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह’ करण्याचे काम पूर्ण करावे. दिनांक ३ एप्रिलनंतर फॉर्म रिमूव्ह करता येणार नाहीत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या प्रवेश प्रक्रियेची लॉटरी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याचे आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी सांगितले.
बीड जिल्हा
तालुका आरटीई पात्र शाळा मोफत राखीव जागा दाखल अर्ज १)आंबेजोगाई : ३७ ३१५ ६४४ २)आष्टी : १४ ५१ ४० ३)बीड : ३८ ४५७ ९१७ ४)धारूर : ८ ११४ १०८ ५)गेवराई : ३६ ३६२ ६१६ ६)केज : २१ १९८ २९४ ७)माजलगाव : २९ २३४ ४३२ ८)परळी : २९ ३१५ ७०५ ९)पाटोदा : ४ २० ३३ १०शिरूर : १० ६९ ८४ ११)वडवणी : ७ ८६ ७०
एकूण : २३३ २२२१ ३९४३