अफवा पसरवणाऱ्या ६ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:26 PM2020-03-20T23:26:03+5:302020-03-20T23:26:33+5:30

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत असे प्रकार करणाºया ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 rumors spread over crime | अफवा पसरवणाऱ्या ६ जणांवर गुन्हे दाखल

अफवा पसरवणाऱ्या ६ जणांवर गुन्हे दाखल

Next

बीड : कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी आणि आरोग्य यंत्रणेचे अधिकारी जनजागृती करत आहेत. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत असे प्रकार करणाºया ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील एका महिलेचा मुलगा दुबईवरून परळीत आला असून, त्याला कोरोनाची लागण झाली आहे, असा संदेश समाजमाध्यमाच्या माध्यमातून पसरवला. याची माहिती संबंधित महिलेने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शहानिशा करून १९ मार्च रात्री उशिरा गोविंद बडे व इतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सोशल मीडियाच्या ग्रुपवर सर्वसामान्य नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण केल्याच्या आरोपरवरुन एका पत्रकारावर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुरुवारी माजलगाव येथे गर्दी जमवून लग्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांना मूळ नाव लपवून खोटे नाव सांगणाºया छायाचित्रकार दिलीप संघर्षकुमार डोंगरे आणि सुचित भगवान बोटे या भटजीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. अटकेनंतर या दोघांच्या नातेवाईकांना आधार कार्डची मागणी केली असता, सुरुवातीला त्यांनी खोटे नाव सांगितल्याचे उघड झाले.

Web Title: 4 rumors spread over crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.