ब्रह्मकमळाला ४० फुलांचा बहर, गौरी-गणेशाची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:39 AM2021-09-14T04:39:22+5:302021-09-14T04:39:22+5:30

फोटो बाजारात गर्दीचा अभाव शिरूर कासार : बाजाराचा दिवस असूनदेखील सोमवारी शहरात फारशी गर्दी नव्हती. पाऊस उघडल्याने ...

40 lotus flowers to Brahma lotus, worship of Gauri-Ganesha | ब्रह्मकमळाला ४० फुलांचा बहर, गौरी-गणेशाची पूजा

ब्रह्मकमळाला ४० फुलांचा बहर, गौरी-गणेशाची पूजा

Next

फोटो

बाजारात गर्दीचा अभाव

शिरूर कासार : बाजाराचा दिवस असूनदेखील सोमवारी शहरात फारशी गर्दी नव्हती. पाऊस उघडल्याने शेतीकामांकडे लक्ष तसेच महालक्ष्मीचा सण असल्याने बाजारपेठेत वर्दळ नसल्याचे सांगण्यात आले.

मास्कचा सर्रास विसर

शिरूर कासार : तालुक्यात आता कोरोनाचा आकडा एक अंकी असून तुरळक गावांत एखाददुसरा रुग्ण निघत असल्याने कोरोनाचा विसर पडला असून, मास्क वापराकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. गर्दीच्या ठिकाणीसुध्दा मास्कचा वापर केला जात नसल्याचे दिसत आहे. कोरोनाचा आकडा घटला असला तरी गाफीलपणा हा धोक्याचा ठरू शकतो. नियमाचे उल्लंघन करू नये असे आवाहन आरोग्य व महसूल विभागाने केले आहे.

सततच्या पावसामुळे उडदाला कर फुटले

शिरूर कासार : काढणीला आलेल्या उडीद पिकाला पावसाने गाठले. तसेच काढणी झालेलीसुध्दा पसर होती. अशातच तीन-चार दिवस सतत पाऊस पडत राहिला. त्यामुळे उडिदाला कर फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे.

पाच दिवसांपासून बसस्थानकासमोर पाणी

शिरूर कासार : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बसस्थानकासमोर तळे साचल्याने परिसरातील नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. पाऊस उघडून पाच दिवस झाले तरी स्थानकाच्या दोन्ही रस्त्यावरचे पाणी अजूनही तसेच असल्याने या परिसराकडे कुणी फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवासी रस्त्यावरच उभे राहून बस थांबवून इच्छित प्रवास करत आहेत.

Web Title: 40 lotus flowers to Brahma lotus, worship of Gauri-Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.