बीडमध्ये ४ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:38+5:302021-04-03T04:30:38+5:30

बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मागील दोन दिवसांपूर्वी जाणवला होता. यावर आरोग्य प्रशासनाने ...

4,000 Remedesivir injections available in Beed | बीडमध्ये ४ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध

बीडमध्ये ४ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध

Next

बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मागील दोन दिवसांपूर्वी जाणवला होता. यावर आरोग्य प्रशासनाने तात्काळ हालचाली करून आणखी ४ हजार इंजेक्शन उपलब्ध केले आहेत. सध्या दररोज सरासरी ३०० ते ३५० इंजेक्शन लागत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हाताबाहेर जात आहे. या बाधितांवर उपचार करणाऱ्या औषधांपैकी रेमडेसिवीर इंजेक्शन एक आहे. सुरुवातीच्या काळात जागतिक आरोग्य संघटना व आयसीएमआरने बाधितांवर उपचार करण्यासाठी हे इंजेक्शन लाभदायक असल्याचे सांगितले होते. नंतर हळूहळू निर्णय बदलत गेले. असे असले तरी आजही जास्त त्रास असणाऱ्यांना हे इंजेक्शन दिले जात आहे. बीड जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता. यावर आरोग्य विभागाने तात्काळ कार्यवाही करून आणखी ४ हजार इंजेक्शन उपलब्ध केले आहेत. अशीच रुग्णसंख्या वाढत राहिल्यास हे इंजेक्शन पुढील १० दिवसांसाठीच पुरतील असे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा या इंजेक्शनची मागणी केली जाणार आहे. खाजगीमध्ये या इंजेक्शनबाबत जास्त शुल्क आकारत असेल तर आरोग्य विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोट

दोन दिवसांपूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनचा थोडा तुटवडा जाणवला होता; परंतु कमी पडले नाहीत. तात्काळ ४ हजार इंजेक्शन मागविण्यात आले. रोज सरासरी ३०० ते ३५० इंजेक्शन लागतात. आणखी मागणी करणार आहोत.

-डॉ. सूर्यकांंत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

---

सध्या उपलब्ध इंजेक्शन ४ हजार

दररोज सरासरी लागणारे इंजेक्शन ३०० ते २५०

Web Title: 4,000 Remedesivir injections available in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.