राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीच्या ४३१ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा तर ६० विद्यार्थी अनुपस्थित - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:00+5:302021-04-09T04:35:00+5:30

२००७-०८ पासून इयत्ता आठवीच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व्हावे, या ...

431 students of National Economically Weak Component Scholarship appeared for the examination while 60 students were absent - A | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीच्या ४३१ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा तर ६० विद्यार्थी अनुपस्थित - A

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीच्या ४३१ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा तर ६० विद्यार्थी अनुपस्थित - A

Next

२००७-०८ पासून इयत्ता आठवीच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व्हावे, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येते. या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांपासून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व मोठे असते. आष्टी येथे २ परीक्षा केंद्रावर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीच्या ४३१ परीक्षार्थांनी परीक्षा दिली यामध्ये ६० विद्यार्थी अनुपस्थित होते. आष्टी येथील जि.प. कन्या प्रशाला या परीक्षा केंद्राचे संचालक ए.के. गुंड हे होते. परीक्षार्थींसाठी १३ हाॅल व एकूण १५ पर्यवेक्षकांचा समावेश होता. आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय या परीक्षा केंद्रावर केंद्रचालक सुधाकर यादव हे होते. तर एकूण २५० परीक्षार्थींसाठी बसले होते. त्यामध्ये ४४ विद्यार्थी अनुपस्थित राहिले तर १३ हाॅल १५ पर्यवेक्षकांचा समावेश होता. या परीक्षेमध्ये बुद्धिमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी या २ विषयांवर १८० गुणांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

Web Title: 431 students of National Economically Weak Component Scholarship appeared for the examination while 60 students were absent - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.