आष्टीत लोकअदालतीत ४४३ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:36 AM2021-09-27T04:36:37+5:302021-09-27T04:36:37+5:30

आष्टी : आष्टी तालुका विधी सेवा समिती, आष्टी तालुका वकील संघ यांच्यावतीने शनिवारी आष्टी येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे ...

443 cases settled in Ashti Lok Adalat | आष्टीत लोकअदालतीत ४४३ प्रकरणे निकाली

आष्टीत लोकअदालतीत ४४३ प्रकरणे निकाली

Next

आष्टी : आष्टी तालुका विधी सेवा समिती, आष्टी तालुका वकील संघ यांच्यावतीने शनिवारी आष्टी येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. यावेळी प्रलंबित दिवाणी, फौजदारी स्वरूपाची १ हजार ९५१ प्रकरणे तसेच १,६८९ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित १४१ दिवाणी आणि ५४ फौजदारी तसेच २४८ दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण ४४३ प्रकरणे निकाली निघाली.

या लोकअदालतीत ८९ लाख ९६ हजार २८८ रुपयांची वसुली झाली. यात तीन पॅनल करण्यात आली होते. पॅनल प्रमुख म्हणून आष्टीचे दिवाणी न्यायाधीश (क स्तर) के. के. माने, बीडचे सहदिवाणी न्यायाधीश (क स्तर) सी. पी. शेळके, आष्टीचे सहदिवाणी न्यायाधीश (क स्तर) व्ही. एन. शिंपी यांनी काम पाहिले. प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद, पोटगी प्रकरणे, बँक कर्जाची दाखलपूर्व प्रकरणे, ग्रामपंचायतीच्या थकबाकीची दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने आपसात तडजोडीने निकाली निघाली. या लोकअदालतीमध्ये कोरोनाबाबतच्या सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले होते.

Web Title: 443 cases settled in Ashti Lok Adalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.