४५० ब्रास वाळूसाठा पोलिसांनी केला जप्‍त; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कार्यवाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:03 AM2021-03-04T05:03:10+5:302021-03-04T05:03:10+5:30

माजलगाव तालुक्यातील गंगामसला आंबेगाव, बोरगाव, मोगरा, सुरुमगाव या गोदाकाटा ठिकाणी असणाऱ्या गावांमधून सर्रास वाळू तस्करी होत आहे. हा सर्व ...

450 brass sand stocks seized by police; Proceedings of Sub-Divisional Police Officers. | ४५० ब्रास वाळूसाठा पोलिसांनी केला जप्‍त; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कार्यवाही.

४५० ब्रास वाळूसाठा पोलिसांनी केला जप्‍त; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कार्यवाही.

Next

माजलगाव तालुक्यातील गंगामसला आंबेगाव, बोरगाव, मोगरा, सुरुमगाव या गोदाकाटा ठिकाणी असणाऱ्या गावांमधून सर्रास वाळू तस्करी होत आहे. हा सर्व प्रकार राजरोसपणे होत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची ओरड नेहमीच होताना दिसत आहे. तालुक्यातून होणाऱ्या वाळू तस्करीवर नियंत्रण लागत नसले तरी डीवायएसपी सुरेश पाटील यांनी परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहनेरच्या गोदापात्रात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आलेल्या वाळू साठ्यावर आपल्या टीम मार्फत कार्यवाही केली. यावेळी पोलिसांनी ४५० ब्रास बेवारस वाळू साठा व एक केनी जप्त केली आहे. दरम्यान, परळी तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी या वाळू साठ्याचा पंचनामा केला आहे. यावेळी या कार्यवाहीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे, पोलीस नाईक भालेराव, पोलीस हवालदार सारुख, देशमुख, फड, भडंगे, पोलीस कर्मचारी सहभागी होते.

-

माजलगाव तालुक्यातील वाळू तस्करांवर मेहेरनजर का?

परळी तालुक्यातील शिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहनेर गोदापात्रात ४५० ब्रास वाळू साठा जप्त केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील यांचे कौतुक होत आहे. परंतु माजलगाव शहरासह तालुक्यात ठिकाणी वाळूचे ढिगारे दिसून येत आहेत. राजरोसपणे याठिकाणी वाळू वाहतूक केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाळूतस्करीवर महसूल पोलीस प्रशासनाची मेहेरनजर का? असा प्रश्न सर्वसामान्यांत निर्माण होताना दिसत आहे.

Web Title: 450 brass sand stocks seized by police; Proceedings of Sub-Divisional Police Officers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.