क्रेडिट कार्डवर ऑफरच्या बहाण्याने ४९ हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:55+5:302021-08-26T04:35:55+5:30

महम्मद नरुजम्मा सय्यद (३२, रा. काझीनगर, बीड) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. २३ ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान ...

49,000 lampas under the pretext of an offer on a credit card | क्रेडिट कार्डवर ऑफरच्या बहाण्याने ४९ हजार लंपास

क्रेडिट कार्डवर ऑफरच्या बहाण्याने ४९ हजार लंपास

Next

महम्मद नरुजम्मा सय्यद (३२, रा. काझीनगर, बीड) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. २३ ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान ते सुभाष रोडजवळील सिद्धीविनायक व्यापारी संकुल परिसरात त्यांना अनोखळी क्रमांकावर फोन आला. यावेळी समोरून बोलणाऱ्या महिलेने त्यांना तुमच्या क्रेडिट कार्डसाठी ऑफर असल्याची बतावणी करत क्रेडिट कार्डची माहिती महम्मद यांच्याकडून विचारून घेतली शिवाय, ओटीपी जाणून घेत खात्यातून ऑनलाईन ४९ हजार ७६० रुपये ट्रान्सफर केले. खात्यातून पैसे वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर सय्यद यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर ठाण्यात अनोळखी महिलेविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे हे करत आहेत.

Web Title: 49,000 lampas under the pretext of an offer on a credit card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.