राष्ट्रीय लोकअदालतीत ११६ खातेदार झाले कर्जमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:15 AM2019-09-15T00:15:16+5:302019-09-15T00:16:06+5:30
शनिवारी येथे झालेल्या राष्टÑीय लोकअदालतमध्ये ११६ कर्जदार आणि बॅँकेत समेट झाला. या कर्जप्रकरणात सुमारे २ कोटी १६ लाख रुपयांची थकबाकी होती. त्याबाबत बॅँक व ग्राहकात तडजोड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शनिवारी येथे झालेल्या राष्टÑीय लोकअदालतमध्ये ११६ कर्जदार आणि बॅँकेत समेट झाला. या कर्जप्रकरणात सुमारे २ कोटी १६ लाख रुपयांची थकबाकी होती. त्याबाबत बॅँक व ग्राहकात तडजोड झाली.
या राष्टÑीय लोकअदालतमध्ये सर्व राष्टÑीयीकृत व सहकारी बॅँकांनी सहभाग नोंदविला होता. बीड जिल्ह्यातील प्रमुख स्टेट बॅँक आॅफ इंडियाची विविध ४० शाखांमधून १५० कर्जप्रकरणे होती. त्यापैकी ११६ कर्ज प्रकरणात एसबीआयच्या निकषानुसार नियमाप्रमाणे सवलत व कर्जभरणा करण्याबाबत बॅँक आणि कर्जधारकामध्ये तडजोड झाली. व्यवसायिक, कृषी आणि वैयक्तिक कर्ज प्रकरणांचा यात समावेश होता. लोकअदालतमध्ये संबंधित कर्जदारांनी अर्ज दिल्यानंतर न्यायिक अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले. बॅँक आणि कर्जदार ग्राहक यांना विचारणा करण्यात आली. त्यानंतर समेटाची प्रक्रिया पूर्ण झाली.
एसबीआयचे क्षेत्रीय प्रबंधक नंदकिशोर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतमध्ये सहभाग घेण्यात आला. यावेळी जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण, जिल्ह्यातील सर्व शाखा प्रबंधक व संबंधित अधिकारी उपस्थित होते. एसबीआय क्षेत्रीय कार्यालयाचे उपप्रबंधक दीपक कुमार यांनी या प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले. त्यांना श्वेता सावळे, अमोल गायके, दिपक ठाकरे यांनी सहकार्य केले.