बाजारकरूंचा टेम्पो उलटून २३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:30 PM2020-01-01T23:30:14+5:302020-01-01T23:31:39+5:30
केज तालुक्यातील जिवाची वाडी येथून वडवणी येथील आठवडी बाजाराला प्रवासी व सामान घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने होऊन २३ प्रवासी जखमी झाले. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यातील जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
येवता : केज तालुक्यातील जिवाची वाडी येथून वडवणी येथील आठवडी बाजाराला प्रवासी व सामान घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने होऊन २३ प्रवासी जखमी झाले. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यातील जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
वडवणी येथे बुधवारी आठवडी बाजार भरतो. सकाळी ८ वाजता जिवाची वाडी येथून २३ प्रवासी आणि बाजारकरुंचे कोंबड्या, शेळ्या, धान्य आदी सामान घेऊन टेम्पो (क्र. एम. एच. २०, एफ ६३७६) निघाला होता. गावापासून एक किमी अंतरावर चालक राणाबा दगडू चौरे याचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो अचानक पलटी झाला. या अपघातात टेम्पोतील सर्व प्रवासी जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सर्व जखमींना स्वारातील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस जमादार बाळकृष्ण मुंडे हे पुढील तपास करीत आहेत.
या अपघातातील जखमींमध्ये केशरबाई बजरंग शिंदे, संजीवन बारिकराव चौरे, छत्रभुज विठ्ठल कुटे, लक्ष्मण गोपाळ चौरे, सुमित्रा बप्पाजी खाडे, वचिष्ट काशीनाथ चौरे, राणबा दगडू चौरे, निलावती दगडू चौरे, कमल महादेव खाडे, सूर्यकांत मारु ती चौरे, संपती गणपती खाडे, शिवकन्या लक्ष्मण चौरे, विकास राणबा चौरे, अर्चना बालासाहेब चौरे, आशाबाई बालू मैंद, बाळकृष्ण दगडू चौरे, हरी लक्ष्मण कुटे, ज्ञानेश्वरी बालासाहेब चौरे, अंजना आसाराम खाडे यांचा समावेश आहे.
रोहतवाडी फाटा येथे अपघात; एक ठार
पाटोदा : तालुक्यातील रोहतवाडी फाटा येथे ३१ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी तीन वाजता शिवशाही बस व दुचाकीमध्ये अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
नवनाथ वामन सानप (वय ५० वर्षे, रा. खडकवाडी, ता. पाटोदा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते ३१ डिसेंबर रोजी गावाकडे दुचाकी (एमएच २३ पी २४२३) वरुन जात होते. यावेळी त्यांच्यापुढे शिवशाही बस (एमएच ९ ईएम ९९७१) ही जात होती. दरम्यान, रोहतवाडी फाट्यावर बस चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे नवनाथ यांची दुचाकी बसला पाठीमागून जोरात आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पाटोदा ठाण्यात बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना मोटे हे करीत आहेत.