पोलीस महासंचालकांकडून बीडच्या ५ कर्मचाऱ्यांना पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:03 AM2018-04-26T01:03:05+5:302018-04-26T01:03:05+5:30
गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाºया बीड पोलीस दलातील पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहिर झाले आहेत. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हा वितरण सोहळा पार पडेल. यामध्ये गेवराईचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेरसह चार कर्मचाºयांचा समावेश आहे.
बीड : गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाºया बीड पोलीस दलातील पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहिर झाले आहेत. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हा वितरण सोहळा पार पडेल. यामध्ये गेवराईचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेरसह चार कर्मचाºयांचा समावेश आहे. या पदकांमुळे बीड जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली असून सर्वांच स्वागत केले जात आहे.
पोलीस दलात राहून विविध कर्तव्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचा पोलीस महासंचालकांकडून प्रत्येक वर्षी बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला जातो. २०१७ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाºया बीडच्या पाच पोलिसांना हे पदक मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेत असताना दरोडेखोर, कुख्यात गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरलेले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिकाºयांमध्ये पदक पटकावले.
गेवराईचे घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणाचा तपास लावण्यात आहेर यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच अट्टल दरोडेखोर शहाद्या भोसले याला पडत्या पावसात आष्टी तालुक्यात तीन किमी चिखल तुडवित पायी जाऊन बेड्या ठोकल्या होत्या. तसेच इतर गँगवरही त्यांनी अनेक कारवाया केल्या होत्या. याचीच दखल घेऊन आहेर यांना पदक दिले आहे. तसेच पोलीस हवालदार अभिमन्यू औताडे यांनी क्लिष्ट व थरारक अशा बहुचर्चित असलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात भूमिका बजावली होती. पोह. परमेश्वर सानप, पोना मुकुंद तांदळे व बाबासाहेब करांडे यांनीही पोलीस दलात १५ वर्षे उत्तम सेवा केली आहे.
या सर्वांना कामगार दिनाचे औचित्य साधून पोलीस मुख्यालयावर आयोजित केलेल्या संचलनानंतर पदक, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी त्यांचे स्वागत केले आहे.