आदर्श ग्रामपंचायत कुसळंबची कोविड केअर सेंटरला ५ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:34 AM2021-05-10T04:34:02+5:302021-05-10T04:34:02+5:30
कुसळंब : पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांच्या पुढाकारातून सुरू झालेले श्री खंडेश्वर ...
कुसळंब : पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांच्या पुढाकारातून सुरू झालेले श्री खंडेश्वर विद्यालयामध्ये कोविड केअर सेंटर सध्या जिल्ह्यामध्ये आदर्श ठरत आहे. सगळ्याच समाजघटकांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. उत्कृष्ट सेवा मिळत असल्याने रुग्णदेखील समाधान व्यक्त करत आहेत. आदर्श ग्रामपंचायत कुसळंबच्या वतीने कोविड केअर सेंटरसाठी ५ लाख रुपयांची मदत करण्यात आली.तर
पिंपळवंडी येथील अजित पवार यांच्याकडून कोविड सेंटरवरील सर्व रुग्णांना एकवेळचे जेवण देण्यात आले.
डॉ. राधाकिसन पवार यांच्या आवाहनाला ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक प्रतिसाद देत आहेत. सामाजिक जाणिवेतून रुग्णसेवेसाठी पुढे येत आहेत. कोणी फळे, कोणी अंडी, कोणी पाणी वाटप करत आहे तर कोणी जेवणाचे नियोजन करत आहे. यामुळे येथील कोविड केअर सेंटरवर एक सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचे दिसत आहे. तर बरा होऊन जाणारा रुग्ण समाधान व्यक्त करत आहे. त्यामुळे कुसळंब कोविड केअर सेंटर जिल्ह्यामध्ये एक प्रकारे आदर्श निर्माण करत आहे. रविवारी पिंपळवंडी येथील युवकांनी पुढाकार घेत संपूर्ण रुग्णांना एकवेळचे जेवण देऊन सामाजिक पाऊल टाकले आहे. यावेळी डॉ.राधाकिसन पवार ,कुसळंबचे सरपंच शिवाजी पवार ,ज्येष्ठ शिवनाथ अण्णा पवार, भाजप नेते बाळासाहेब पवार ,पिंपळवंडीचे सरपंच ज्ञानेश्वर पवार ,महादेव दादा पवार ,भाजप नेते आबासाहेब पवार ,विलास पवार, शिवाजी पवार ,डॉ.रेवन्नाथ पवार ,अशोक पवार ,रवी जाधव ,संजय पवार, सांगळे सर यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
कुसळंब येथील कोविड सेंटरमध्ये सुरुवातीला ५० बेड होते. त्यामुळे सर्व रुग्णांना बाथरुमची सोय होत होती. परंतु ५० बेडचे सेंटर आज १०० बेडचे सेंटर झाले आहे. त्यामुळे रुग्ण वाढले आहेत. सर्वांना बाथरुमची अडचण येऊ लागली. त्यामुळे तातडीने बाथरुम बांधण्यासाठीही मदत करण्यात आली आहे - मेजर शिवाजी पवार,
सरपंच, कुसळंब.
===Photopath===
090521\img_20210509_125908_711_14.jpg~090521\img_20210509_131159_734_14.jpg