चिठ्ठीद्वारे मागितली ग्रामसेवकाकडे पाच लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:50 AM2018-02-10T00:50:59+5:302018-02-10T00:54:22+5:30
बीड तालुक्यातील नेकनूर येथील ग्रामसेवक बालाजी नाथा साळुंके यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने चिठ्ठी फेकली. यामध्ये पाच लाख रूपये देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तालुक्यातील नेकनूर येथील ग्रामसेवक बालाजी नाथा साळुंके यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने चिठ्ठी फेकली. यामध्ये पाच लाख रूपये देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
साळुंके हे खर्डेवाडी आणि कारेगव्हाण येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. साळुंके यांच्या घरात गुरूवारी रात्री अज्ञात व्यक्तीने दगडाला बांधुन एक चिठ्ठी फेकली. यामध्ये ‘तुला व तुज्या मुलाला जिवंत पहायचे असेल तर पाच लाख रूपये दे’ असे लिहिण्यात आले आहे. हा प्रका गुरूवारी सकाळी झोपेतून उठल्यावर साळुंके यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ नेकनूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली असून हा प्रकार खरोखरच आहे की, वैमनस्यातून झाला? याबाबत तर्कवितर्क लावले जात असून, पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगितले.