विनाकारण फिरणाऱ्यांच्या टेस्टमध्ये ५ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:34 AM2021-04-20T04:34:55+5:302021-04-20T04:34:55+5:30
माजलगाव : महाराष्ट्र शासनाने निर्बंध कडक करूनदेखील शहरातील रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या लोकांच्या संख्येत फरक पडत नव्हता. त्यामुळे तहसील, ...
माजलगाव : महाराष्ट्र शासनाने निर्बंध कडक करूनदेखील शहरातील रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या लोकांच्या संख्येत फरक पडत नव्हता. त्यामुळे तहसील, पाेलीस आणि नगर परिषद प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या लोकांची अँटिजान टेस्ट करण्याचा निर्णय घेत कारवाईचा बडगा उगारला. यात ९४ जणांची चाचणी करण्यात आली. त्यात ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ही कार्यवाही पुढेदेखील सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी तहसीलदार वैशाली पाटील, नगरपालिोचे मुख्याधिकारी विशाल भोसले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी माजलगाव शहरात अत्यावश्यक सेवा देणारे, व्यापारी, दुकानदार, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची जागेवरच अँटिजेन टेस्ट करण्याची मोहीम सुरू करण्यासंदर्भात शनिवारी निर्णय घेऊन तशी कल्पना समाज माध्यमांमधून दिली होती. त्यानुसार रविवारी १३५ जणांची चाचणी करण्यात आली असता, ५ जण पॉझिटिव्ह आले होते; तर सोमवारी ९४ जणांच्या चाचणीत ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यावरून कोरोनाच्या गंभीरतेची प्रचिती येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कुठलेही महत्त्वाचे काम नसताना बाहेर फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनेकांनी काढला पळ
सोमवारी रस्त्यावरून फिरणाऱ्यांच्या टेस्ट होत असल्याचे पाहून अनेकांनी वाट वाकडी करीत पळ काढला. त्यामुळे दुपारनंतर शहरात संपूर्ण शुकशुकाट पाहावयास मिळाला.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, मुख्याधिकारी विशाल भोसले, उपनिरीक्षक अविनाश राठोड, पोलीस उपनिरीक्षक जयराज भटकर, फौजदार विजय थोटे, पालिका कर्मचारी जगदीश जाधवर, आशिष तुसे, संतोष घाडगे, संदीप रांजवन, शंकर चव्हाण आदींसह अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
माजलगावात ठिकठिकाणी पथकाने विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करून त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली.
===Photopath===
190421\purusttam karva_img-20210419-wa0033_14.jpg