कुसळंब, घाटनांदूर, बनसारोळ्याला ५० खाटांच्या सीसीसी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:34 AM2021-04-21T04:34:02+5:302021-04-21T04:34:02+5:30

बीड : जिल्ह्यात वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता आता ग्रामीण भागातही कोवीड केअर सेंटर सुरू केले जात आहेत. पाटोदा तालुक्यातील ...

50-bed CCC sanctioned for Kusalamb, Ghatnandur, Bansarola | कुसळंब, घाटनांदूर, बनसारोळ्याला ५० खाटांच्या सीसीसी मंजूर

कुसळंब, घाटनांदूर, बनसारोळ्याला ५० खाटांच्या सीसीसी मंजूर

Next

बीड : जिल्ह्यात वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता आता ग्रामीण भागातही कोवीड केअर सेंटर सुरू केले जात आहेत. पाटोदा तालुक्यातील कुसळंब, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर तर केज तालुक्यातील बनसारोळा येथे मंजूरी मिळाली असून प्रत्येक ठिकाणी ५० खाटा असणार आहेत. मानवलोक संस्था खाटा, गाद्या आणि इतर साहित्य मोफत देणार असून आरोग्य विभागाचे मनुष्यबळ आणि औषधी असणार आहेत.

जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या बाधितांना गावातच उपचार मिळावेत, यासाठी ग्रामीण भागातच कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुसळंब, घाटनांदूर आणि बनसारोळा येथे सीसीसी करण्यासाठी मंजूरीही मिळाली आहे. या सीसीसीत लागणारे साहित्य पुरविण्याची जबाबदारी मानवलोक संस्थेने घेतली आहे. आपत्ती आणि अडचणीच्या काळात मानवलोकने सामान्यांना आधार देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. तीन ठिकाणी प्रत्येकी ५० खाट तयार होणार असल्याने जिल्ह्यात आणखी १५० खाटांची भर पडली आहे. या सीसीसीमध्ये लागणारे डॉक्टर, परिचारीका व इतर मनुष्यबळ तसेच औषध पुरवठा आराेग्य विभागाकडून पुरविला जाणार आहे. दोन दिवसांत या सर्व सीसीसी कार्यान्वित होतील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी सांगितले.

Web Title: 50-bed CCC sanctioned for Kusalamb, Ghatnandur, Bansarola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.