५० नवे रुग्ण, २९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:08+5:302021-01-24T04:16:08+5:30
जिल्ह्यात शनिवारी ७४२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ६९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ५० जणांचे अहवाल बाधित ...
जिल्ह्यात शनिवारी ७४२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ६९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ५० जणांचे अहवाल बाधित आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई १२, आष्टी २, बीड १६, केज ६, माजलगाव १, परळी ३ आणि शिरुर कासार तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे. सुदैवाने शनिवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही तर २९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १७ हजार ५४९ एवढी झाली असून यापैकी १६ हजार ७४४ जण कोरोनामुक्त झाले आहे. तर ५५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.