बीड जिल्ह्यात चारा पिकांमध्ये १० वर्षांत ५० टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 11:47 PM2019-06-09T23:47:02+5:302019-06-09T23:47:32+5:30
जिल्ह्यातील खरीप व रबी हंगामातील चारा पिकांच्या टक्केवारीत मागील १० वर्षात ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील खरीप व रबी हंगामातील चारा पिकांच्या टक्केवारीत मागील १० वर्षात ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तसेच पेरा कमी झाल्यामुळे ज्वारी, बाजरीसह इतर धान्याचे भाव देखील वाढले आहेत.
बीड जिल्ह्यात एकूण लागवडीखालील क्षेत्र ८ लाख ६६ हजार २२५ हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामातील लागवडीखाली ७ लाख २७ हजार ५२३ हेक्टर एवढे आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन या नगदी पिकांचा पेरा वाढल्यामुळे इतर पारंपारिक पिकांचा पेरा घटला आहे. २००९ ते २०१९ या कालावधीमध्ये तब्बल ४५ ते ५० घट खरीप व रब्बी ज्वारी, मका व इतर पारंपारिक पिक लागवडीमध्ये घट झाली आहे. मागील दहा वर्षात दर एका वर्षाआड पडणारा दुष्काळ व बदललेली पिकपद्धती यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील पशुधन १२ लाखाच्या जवळापास आहे. मात्र, चारा उपलब्ध नसल्यामुळे यावर्षी ६०३ चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत.
मागील १० वर्षात बदलेल्या पिकपद्धतीमुळे शेतीची उत्पादनक्षमता देखील कमी होत असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नगदी पिकांमुळे शेतीला पुरक असलेला दूध व्यवसाय संपुष्टात आला आहे. तसेच उत्पादन क्षमता व पाणी प्रश्न गंभीर झाल्यामुळेव शेतीच्या कमासाठी यंत्राचा वापर वाढल्यामुळे जनावरे कमी झाले आहेत. त्यामुळे चारा व इतर पारंपारिक पिकांना फाटा देऊन नगदी पिकांच्या पेरा अधिक होत आहे. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळत आहे. तसेच बाजरी, ज्वारी या पिकांचा पेरा कमी होत असल्यामुळे किंमत वाढ आहे. याचा परिणाम नागरिकांच्या धान्य खरेदीवर होत आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात तरी पारंपारिक पिकांचा पेरा केला पाहिजे असे मत कृषी विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केले.
शेतकºयांची आर्थिक स्थिती बिघडली
पुर्वी पाशुधन पुरक पिकपद्धती होती मात्र, मागील काही वर्षात जनावरांची संख्या घटली व नगदी पिके घेण्यावर भर दिला गेला आहे.
त्यामुळे शेणखतातून मिळणारे मुलद्रव्य कमी झाले व त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.
त्यामुळे शेतकºयांनी शेतीला पुरक म्हणून दूध व्यवसाय केला पाहिजे तसेच पुन्हा एक दा नवतंत्रज्ञानाचा वापर करुन पारंपारिक पिकपद्धतीचा अवलंब देखील करणे गरजेचे आहे.
यामुळेच शेतीमधील उत्पादन वाढेल व शेतकरी समृद्ध होईल असे मत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी व्यक्त केले आहे.