५० हजार गुंतवणूकदारांचे अडकले २५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:38 PM2018-01-24T23:38:04+5:302018-01-24T23:38:31+5:30

बीड : पॅनकार्ड क्लब्ज कंपनीत बीड जिल्ह्यातील ५० हजार गुंतवणूकदारांचे सुमारे २५ कोटी रुपये अहकले असून राज्यातील ३५ लाख ...

50 thousand investors stuck 25 crores | ५० हजार गुंतवणूकदारांचे अडकले २५ कोटी

५० हजार गुंतवणूकदारांचे अडकले २५ कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील ३५ लाख गुंतवणूकदारांचे ३० जानेवारीला आंदोलन

बीड : पॅनकार्ड क्लब्ज कंपनीत बीड जिल्ह्यातील ५० हजार गुंतवणूकदारांचे सुमारे २५ कोटी रुपये अहकले असून राज्यातील ३५ लाख गुंतवणूकदारांचा परतावा परत मिळावा म्हणून राष्ट्रशक्ती संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३० जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को- आॅर्डीनेशन कमिटीचे पदाधिकारी एस. एस. तांबोळी, दत्तात्रय वायकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

तांबोळी म्हणाले, राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को- आॅर्डीनेशन कमिटीच्या स्थापनेनंतर राज्यभर गुंतवणूकदारांचे २७ मेळावे घेतले. पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या मिळकती विकून गुंतवणूकदारांची रक्कम परत करावी असे आदेश १२ मे २०१७ रोजी सॅट कोर्टाने दिला होता. मात्र सेबीकडून मिळकतीच्या विक्री करण्याबातची प्रक्रिया संशयास्पद असून मिळकतींची किंमत अव्यवहार्यपणे ५० ते ६० टक्क्यांनी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.

या प्रश्नी राज्यातील सर्व खासदारांचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन केले. त्यानंतर हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना- भाजपच्या खासदारांच्या ोिटमंडळाने गुंतवणूकदारांच्या प्रतिनिधींसमवेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. त्यावेळी अर्थमंत्री जेटली यांनी आठ दिवसात सेबीला अहवाल देण्याचे निर्देश केले होते. मात्र अद्याप राष्टÑशक्ती इन्व्हेस्टर्स को- आॅर्डीनेशन कमिटीच्या मागण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

कंपनीच्या मिळकती प्रत्यक्षात कंपनीच्या नसून त्या गुंतवणूकदारांच्या आहेत. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत गुंतवणूकदारांचे किमान सहा सदस्य घ्यावेत. तसेच शासनाने विक्री प्रक्रियेतून मिळणाºया रकमेतून आधी गुंतवणूकदारांची रक्कम द्यावी, सामान्य गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असलेल्या मॅच्युरिटी सर्टिफिकेट जमा करण्यासाठी सेबीने स्वतंत्र सेल निर्माण करावा, अशी मागणी केली. या वेळी विष्णू सवासे, पांडुरंग थोरात, अशोक केकान, एन. जी. शेख, काका थोरात, फय्याज शेख, नारायण , पप्पू आर्सुळ, गोकुळ थोरात उपस्थित होते.

जिल्ह्यात २५ कोटींची गुंतवणूक
दहा वर्षांपूर्वी पॅनकार्ड क्लब्जचा बोलबाला होता. जिल्ह्यातील सामान्य, मध्यम व मोठ्या गुंतवणूकदारांनी या कंपनीत चांगला परताव्याच्या हमीपोटी गुंतवणूक केली होती. जवळपास २५ कोटींची ही गुंतवणूक असल्याचे एका गुंतवणूकदाराने सांगितले. मात्र परताव्याची मुदत जशी संपत आली, त्याचवेळी सेबीने कारवाई केल्याने गुंतवणूकदारांची रक्कम फसली.

मिळकतींची किंमत ‘सेबी’कडून होतेय कमी
पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या सर्व ८४ मालमत्ता सील करण्याचे आदेश असतानाही २७ मिळकतीच सील केल्या आहेत.गुंतवणूकदारांची रक्कम कशी मिळणार त्यामुळे पॅनकार्ड क्लब्जच्या सर्व मिळकती सील कराव्यात, गुंतवणूकदारांची यादी केलेल्या गुंतवणूकीसह जाहीर करावी अशी मागणी एस. एस. तांबोळी, दत्तात्रय वायकर यांनी केली.

Web Title: 50 thousand investors stuck 25 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.