ओल्या कचऱ्यापासून ५० टन गांडूळ खत निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:18 AM2018-10-24T00:18:53+5:302018-10-24T00:19:20+5:30

बीड पालिकेने ओला व सुका कचरा विलगीकरण करणे सुरू केले आणि याचा मोठा फायदा होत आहे. मागील पाच महिन्यात ओला कचºयापासून तब्बल ५० टन गांडूळ खत निर्मिती केली आहे. या खतापासून बीड शहरातील चारही उद्यानात हिरवळ पसरली आहे. पालिकेची ही संकल्पना सर्व पालिकांसाठी आदर्श ठरू पहात आहे.

50 tons of vermilion fertilizer production from wet waste | ओल्या कचऱ्यापासून ५० टन गांडूळ खत निर्मिती

ओल्या कचऱ्यापासून ५० टन गांडूळ खत निर्मिती

Next
ठळक मुद्देपालिकेची संकल्पना : बीड शहरातील चार उद्यानांमध्ये फुलली हिरवळ; स्वच्छतेसाठी केले उपाय

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड पालिकेने ओला व सुका कचरा विलगीकरण करणे सुरू केले आणि याचा मोठा फायदा होत आहे. मागील पाच महिन्यात ओला कचºयापासून तब्बल ५० टन गांडूळ खत निर्मिती केली आहे. या खतापासून बीड शहरातील चारही उद्यानात हिरवळ पसरली आहे. पालिकेची ही संकल्पना सर्व पालिकांसाठी आदर्श ठरू पहात आहे.
स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत ‘स्वच्छ व सुंदर शहर’ करण्यासाठी बीड पालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. शहर हागणदारीमुक्त करण्याबरोबरच ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी पालिकेने कठोर परिश्रम घेतले. स्वच्छता विभागात अपुरे मनुष्यबळ आहे. तरीही मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी योग्य नियोजन करून वेगवेगळी पथके तयार केली. या पथकांच्या माध्यमातून जनजागृतीबरोबरच ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले जाते. पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व विभाग स्वच्छेतेसाठी रस्त्यावर असतात. असे असले तरी नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याने अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरत आहे.
दरम्यान, शहरात निघणाºया ओला कचºयापासून गांडूळ खत तयार करण्याचा निर्णय घेतला. याला यश आले आहे.
आतापर्यंत तब्बल ५० टन गांडूळ खत निर्मिती करण्यात पालिका यशस्वी ठरली आहे. एवढेच नव्हे तर याच खतापासून बीड शहरातील जोशी उद्यान, यशवंत उद्यान, विद्यानगर पूर्व उद्यान, प्रियदर्शनी उद्यानातील बाग फुलविली जात आहे. यामुळे सर्वत्र हिरवळ पसरल्याचे दिसते.
मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता राहुल टाळके, स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके, आर.एस.जोगदंड, भागवत जाधव, भारत चांदणे, रमेश डहाळे, महादेव गायकवाड, ज्योती ढाका ही टिम यशस्वी काम करत आहे.

Web Title: 50 tons of vermilion fertilizer production from wet waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.