घाटशिळा प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:12 AM2021-09-02T05:12:48+5:302021-09-02T05:12:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथील घाटशिळा मध्यम प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा आल्याने मोठा दिलासा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथील घाटशिळा मध्यम प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक मोठा पाऊस आल्याने जवळपास २५० वीजपंप पाण्यात बुडाले असल्याची माहिती सरपंच वैजीनाथ खेडकर यांनी सांगितली.
सोमवारी तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. यामुळे घाटशीळ पारगाव धरणात ५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यामु्ळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टंचाई काळात पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात मोटारी बसवल्या होत्या. या पावसाने त्या पाण्यात बुडाल्या आहेत, असेही खेडकर यांनी सांगितले.
या प्रकल्पामुळे घाटशीळ पारगावसह चुंभळी, टाकळी, ढाकणवाडी, मानूर, गाडेवाडी, श्रीपतवाडीची सुमारे १५०० एकर जमीन ओलिताखाली आली आहे. प्रकल्पात ५.५० मीटर सांडव्याची उंची आहे. सध्या ३.५ मीटर पाणी आले आहे.
010921\1753-img-20210901-wa0038.jpg
घाटशिळा प्रकल्प