घाटनांदूर तपासणी शिबिरात ५ हजार रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:19 AM2018-09-25T01:19:06+5:302018-09-25T01:19:17+5:30
सर्वांगीण विकासाबरोबरच मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी गरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटनांदूर : सर्वांगीण विकासाबरोबरच मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी गरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.
अंबाजोगाई पं.स. व राकाँच्या वतीने घाटनांदूर येथे आयोजित नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिबिरात नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व जे.जे. रुग्णालय नेत्र विभाग प्रमुख डॉ.रागिणी पारेख यांनी पाच हजार रुग्णांची तपासणी केली. यातील शस्त्रक्रि या आवश्यक असलेल्या रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांच्यावर लवकरच मोफत उपचार करून देण्यात येणार आहेत.
यावेळी व्यासपीठावर माजी आ.पृथ्वीराज साठे, राकाँ जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट, कृउबा उपसभापती गोविंद देशमुख, विलास सोनवणे, जि.प.सदस्य शिवाजी सिरसाट व पदाधिकारी उपस्थित होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी येथील वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व स्टाफ, विद्यार्थी तसेच श्री सोमेश्वर विद्यालयाचे कर्मचारी स्वंयसेवक विद्यार्थी हे संपूर्ण दिवसभर कार्यरत होते. यावेळी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी डॉ.राजाराम मुंडे, गौतम नागरगोजे, गणेश देशमुख, सरपंच ज्ञानोबा जाधव, रणजित लोमटे, शंकर उबाळे, बाळासाहेब मुडेगावकर, विलास मोरे, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, अख्तर जहागीरदार, बाळासाहेब राजमाने, सभापती मीना भताने, उपसभापती तानाजी देशमुख, पं.स. सदस्य मच्छिंद्र वालेकर, प्रशांत जगताप, विठ्ठल ढगे, शिवहार भताने, बीडीओ विठ्ठल नागरगोजे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अंबाजोगाई पं.स., स्वाराती रूग्णालय व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.