८ महिन्यांच्या दोन बाळांसह ५१ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:52+5:302021-04-18T04:33:52+5:30

माजलगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पात्रुड अंतर्गत वांगी उपकेंद्रातील वांगी व चोपणवाडी या ठिकाणी शनिवारी कोविड-१९ अँटिजन तपासणी ...

51 corona infected with two 8 month old babies | ८ महिन्यांच्या दोन बाळांसह ५१ कोरोनाबाधित

८ महिन्यांच्या दोन बाळांसह ५१ कोरोनाबाधित

Next

माजलगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पात्रुड अंतर्गत वांगी उपकेंद्रातील वांगी व चोपणवाडी या ठिकाणी शनिवारी कोविड-१९ अँटिजन तपासणी करण्यात आली. एकूण २८७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ५१ रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले. २३६ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. वांगी येथे १८० जणांची चाचणी झाली. यापैकी ३८ पाॅझिटिव्ह तर १४२ निगेटिव्ह अहवाल निष्पन्न झाले. चोपणवाडी येथे १०७ जणांची चाचणी करण्यात आली. यात १३ पाॅझिटिव्ह तर ९४ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. पाॅझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना शनिवारी माजलगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात कोरोना संक्रमण वाढत आहे. ग्रामस्थांनी काळजी घेणे अत्यावश्यक असून, संक्रमण टाळणे गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या काळात कोरोनाची भीषणता वाढण्याची चिंता आहे.

- डाॅ. याज्ञिक रणखांब, प्राथमिक आरोग्य केंद्र, पात्रुड.

दिंद्रुड आठवडाभर बंद

दिंद्रुड परिसरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता दिंद्रुड येथे आठवडाभर संपूर्ण बंद पाळत आहोत. केवळ दवाखाना व मेडिकल वगळता कुठलेही दुकान या कालावधीत चालू करणार नाहीत. दिंद्रुडच्या ग्रामस्थांनी हा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.

- अजय कोमटवार, सरपंच, दिंद्रुड

Web Title: 51 corona infected with two 8 month old babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.