सर्पराज्ञी प्रकल्पास ५१ हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:24 AM2021-04-29T04:24:33+5:302021-04-29T04:24:33+5:30
शिरूर कासार : कोरोनाच्या काळात सर्पराज्ञीस वन्यजीवांच्या सेवा शुश्रूषेसाठी येणारी आर्थिक अडचण ...
शिरूर कासार : कोरोनाच्या काळात सर्पराज्ञीस वन्यजीवांच्या सेवा शुश्रूषेसाठी येणारी आर्थिक अडचण सोडविण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत आमदार सुरेश आण्णा धस यांनी निस्वार्थ भावनेतून ५१ हजार रुपये सामाजिक कर्तव्य निधी सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांच्या खात्यात जमा केला.
येथील जखमी, आजारी व मातृत्वापासून दुरावलेल्या वन्यजीवांना कोरोनाच्या काळात नवजीवन देणारी ही मदत संजीवनी देणारी असल्याचे मत सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे यांनी व्यक्त केले.
रानोमाळ झाडाखाली बाटल्यांचा खच
शिरूर कासार : सध्या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाॅकडाऊन असला तरी मद्यपी शाैकिन मात्र निवांत जागा शोधून त्याठिकाणी आपली हौस पुरवतातण मात्रए यातून शेतात जागोजागी झाडाखाली दारूच्या बाटल्या तशाच टाकून ते निघून जातात. सोबत पाण्याच्या बाटल्या आणखी काय काय असतेण त्याचा कचरा झाडाखाली तसाच टाकला जात असल्याने सध्या ज्या झाडाखाली बसून दुपारचे जेवण शेतकरीए महिला मजूर हे करीत असतात ती जागाच बाटल्यांनी व्यापली आहे. ऐन दुपारचा वेळ गाठून हा सर्व प्रकार घडत असल्याने तो शेतकऱ्यांना दिसून येत नाही. मात्र, या बाटल्या पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला.